जन्मतारखेवरुन प्रेमजीवन कसं असू शकतं याचा याबाबत अंकशास्त्रात सांगितलं आहे. हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंकशास्त्राला देखील खूप महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार जन्मतारखेवरुन एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो.
मुलांक 1 : मुलांक 1 हा सूर्याच्या अधिपत्याखाली येतो. यांच्या स्वभावात अहंकार असल्याने याचा प्रेमजीवनात यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे यांनी प्रेमात अहंकार बाजूला ठेवावा असं अंकशास्त्र सांगतं.
मुलांक 2 : चंद्राच्या प्रभावाखाली असलेली ही माणसं अत्यंत भावनाशील असतात. या माणसं नाती मनापासून जोडतात मात्र याच कारणाने अनेकदा यांचा गैरफायदा घेतला जातो.
मुलांक 3 : ही मंडळी जोडीदाराशी उत्तम संवाद साधतात. या मुलांकाची माणसं आपल्या जोडीराला नात्यामध्ये स्वातंत्र्य देतात. ही माणसं जोडीदाराला विश्वासात घेत आयुष्य जगतात.
मुलांक 4 : मुलांक 4 च्या व्यक्ती प्रेमात आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात. ही माणसं नात्याबाबत खूप प्रमाणिक असतात.
मुलांक 5: प्रेमासाठी धाडसं करणं यांना आवडतं. ही माणसं जोडीदाराच्या मतांचा आदर करणारी असतात. जोडीदाराची स्वप्नं पूर्ण करण्य़ासाठी हे प्रयत्न करतात.
मुलांक 6 : शुक्राच्या अंमलाखाली असलेली ही मंडळी रोमॅंटीक असतात. आपल्या जोडीदाराला सरप्राईज देणं यांना जास्त आवडतं.
मुलांक 7: ही मंडळी जोडीदाराला सर्वात जास्त प्रायोरीटी देतात.ही माणसं भावनिकदृष्ट्या संयमी आणि खंबीर असतात.
मुलांक 8 : या मुलांकाचा स्वामी शनी आहे. या मंडळींना आयुष्यात प्रेमासाठी संघर्ष करावा लागतो. ही माणसं जोडीदाराशी प्रामाणिक असतात. प्रेम मिरवण्याची नाही तर निभावण्याची जाणीव आहे. ही माणसं प्रेम निभावतात. मात्र बऱ्याचदा यांना विरह सहन करावा लागतो. ही माणसं जोडीराचा आदर करणारी असतात. यांच्या आयुष्यात यांना प्रेम उशीराने मिळतं.
मुलांक 9 : मंगळाच्या अधिपत्याखाली येणारी ही माणसं प्रेमात विश्वासघात सहन करु शकत नाही. या व्यक्ती खूप संवेदनशील असतात. . मुलांक 9 च्या लोकांना प्रेमात पूर्णतः समर्पित असतात.