हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. याद्वारे कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीमत्त्व आणि जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजू शकतात. आज आम्ही तुम्हाला तीन अशा तारखा सांगणार आहोत ज्या जन्मत:च व्यक्तीसाठी भाग्यशाली असल्याचे मानले जाते. यात तुमची जन्मतारीख तर नाही? चला जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
तुमचं भाग्य तुमच्या बर्थ डेटवर अवलंबून आहे; जन्मतःच भाग्यशाली असतात या 3 तारखांना जन्मलेले लोक
जर एखाद्या व्यक्तीचा जन्म ७, १६ किंवा २५ तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक ७ मानला जातो. या संख्येचा स्वामी ग्रह केतू आहे. ७ मूलांक असेलेली लोक धाडसी, स्वावलंबी आणि मेहनती असतात.
७ अंकाचे लोक कठीण परिश्रमाने समाजात आपली एक वेगळी ओळख बनवतात. शिक्षण क्षेत्र असो वा व्यावसायिक ही लोक कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात
अनेकदा त्यांच्या प्रयत्नांमुळे ते लोकंमध्ये प्रसिद्ध आणि आदरणीय राहतात. या राशीचे लोक स्वभावाने दयाळू आणि सभ्य असतात.
ते संभषणात इतके उत्स्फूर्त आणि आकर्षक असतात की आपल्या बोलण्याने ते समोरच्या व्यक्तीचे मन जिंकतात. त्यांना स्वत:च्या हिमतीवर आणि परिश्रमांवर यश मिळवायला अधिक आवडते.
७ अंकाचे लोक सामान्यत: शांत असतात पण राग आल्यावर ते फार आक्रमक बनतात. कधीकधी ते रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊन बसतात, ज्यामुळे त्याने अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता असते