आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात अस्वस्थपणा जाणवतो? पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा 'हे' काम
कोमट पाणी पिण्याचे फायदे?
आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी उपाय?
पचनक्रिया सुधारण्यासाठी काय करावे?
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होणे फार गरजेचे आहे. अन्यथा संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीचा परिणाम मेंदूच्या आरोग्यावर होतो. पोटातील आतड्या दुसरा मेंदू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आतड्या स्वच्छ असल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे ऍसिडिटी, गॅस, अपचन आणि पोटाच्या असंख्य समस्या उद्भवतात. शरीरातील घाणीचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. यामुळे शरीराला कोणत्याही आजाराची लागण होऊ शकते. पोट व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी अनेक लोक सकाळी उठल्यानंतर वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे सेवन करतात. पण स्तब केमिकल युक्त सप्लिमेंट्सचे सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतडे स्वच्छ करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल.(फोटो सौजन्य – istock)
शरीरासाठी पाणी अमृता समान मानले जाते. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. याशिवाय आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाणी प्याले जाते. कोमट पाणी प्यायल्यामुळे केवळ आतड्याचं नाहीतर शरीर सुद्धा स्वच्छ होते. गट हेल्थ चांगले ठेवण्यासाठी उठल्यानंतर कोमट पाणी प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेला विषारी मल बाहेर पडून जाण्यास मदत होईल. गॅस, एसिडीटी, ब्लॉटींग, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांनी कायमच त्रस्त असाल तर कोमट पाणी प्यावे. महिनाभर नियमित कोमट पाणी प्यायल्यास आतडे सक्रिय होतील आणि शरीर स्वच्छ होईल.
वारंवार तुम्हाला ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यावा. यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. पण जास्त गरम पाण्याचे सेवन करू नये. यामुळे अन्ननलिकेचा हानी पोहचते.
कोमट पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सक्रिय होते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू किंवा ओवा पावडर मिक्स करून सुद्धा पिऊ शकता. कोमट पाणी प्यायल्यामुळे पोटाची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्टतेचा त्रास दूर होतो. याशिवाय मेटाबॉलिझ्म वाढते. पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी कोणत्याही इतर पेयांचे सेवन करण्याऐवजी कोमट पाणी प्यावे. कोमट पाण्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावडतात आणि रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते.
Ans: बद्धकोष्ठता किंवा अतिसार नसणे, चांगली ऊर्जा पातळी आणि शांत झोप.
Ans: वारंवार ॲसिडिटी, गॅस, किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होणे.
Ans: दही, ताक, किमची, लोणचे यांसारखे आंबवलेले पदार्थ.






