राज्यभरात सगळीकडे कडक ऊन पडत आहे. या वाढत्या उन्हाळ्यात बाहेर गेल्यानंतर आरोग्यासह त्वचेची जास्त काळजी घ्यावी. या दिवसांमध्ये दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे. ऊन वाढल्यानंतर घराच्या आजूबाजूला असलेल्या कानाकोपऱ्यात असलेल्या पाली लगेच बाहेर येतात. पाली पाहिल्यानंतर घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच घाबरतात. विशेषतः घरात असलेल्या महिलांना पालीची जास्त भीती वाटते. पण पाल ना पकडता येत ना धरता येत. अशावेळी उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये पाली घरात येऊ नये म्हणून या वनस्पतीची झाडे घरात आणून लावावी. यामुळे तुमच्या घरात पाल किंवा इतर कोणतेही किडे येणार नाहीत. (फोटो सौजन्य – iStock)
पालीची भीती वाटते? मग घरातील कुंडीमध्ये लावा 'या' प्रभावी वनस्पती
हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला विशेष महत्व आहे. तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक गोष्टींसाठी केला जातो. घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि प्रसन्न वाटू लागेल. घरात पाली येऊ नये म्हणून तुळशीचा रस घरातील खिडकी किंवा दरवाज्यांवर शिंपडावा.
लसणीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. तसेच घरात पाली येऊ नये म्हणून घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही लसूणचे रोप लावून ठेवू शकता.
पुदिन्याचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. या वनस्पतीच्या वासाने घरात पाली येत नाहीत. पुदिन्याचा तीव्र वास पालींना अजिबात आवडत नाही.
झेंडूच्या फुलांचे झाड घरात लावल्यास पाली येणार नाहीत. या झाडाचा वास अतिशय तीव्र असतो, जो पालींना किंवा इतर किड्याना आवडत नाही. त्यामुळे घरात तुम्ही झेंडूचे झाड लावू शकता.
घरामध्ये पाली किंवा इतर कोणतेही किडे येऊ नयेत म्हणून लेमन ग्रास लावावे. ही वनस्पती घरात लावल्यास एकही पाल घराच्या कोपऱ्यात किंवा आजूबाजूला दिसणार नाही. लेमन ग्रास वनस्पतीचा वास अतिशय तीव्र असतो जो पालींना आवडत नाही.