(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
या घटनेचा व्हिडिओ @sadharan_sa_sourabh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देताना लिहिण्यात आले की, “कुद्रा लेक्समधील एका सामान्य वीकेंडला आम्ही महामहिम शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांना तिथून जाताना पाहिले. हे क्षण अविस्मरणीय होते. त्यांनी मुलांनी आशिर्वाद दिला, कोल्ड काॅफी दिली आणि त्यांच्या दयाळूपणाने खरोखरच हा एक खास क्षण बनला”.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तेथे कोणतीही कडक सुरक्षा किंवा गाड्यांचा ताफा नव्हता, तसेच रस्ता मोकळाही नव्हता. वातावरण पूर्णपणे सामान्य होते. गाडी कुटुंबाजवळून जात असताना, शेख मोहम्मद यांनी स्वतः त्यांची खिडकी खाली केली आणि मुलांना हसत आपल्याकडे बोलावले. त्यांनी मुलांना जवळ बोलावले, त्यांना आशीर्वाद दिला आणि फोटोही काढले. सत्तेच्या शिखरावर असलेल्या शासकाच्या या साध्या हावभावाने उपस्थितांना भावूक केले.
कुटुंबातील एका सदस्याने हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद केला. सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर हा व्हिडिओ लवकरच व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो पाहिला आहे आणि हजारो लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती छान” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते खरोखर उदार होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांचा साधेपणा लक्षणीय होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






