Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
14 Feb 2026 10:25 AM (IST)
तासगावच्या सांस्कृतिक परंपरेत भर घालणारा रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच ‘आर. आर. (आबा) पाटील स्मृती करंडक २०२६’ हा राज्यस्तरीय एकांकिका महोत्सव आजपासून १४ पासू सुरू होत आहे. हा महोत्सव १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी रंगणार असून, संपूर्ण महाराष्ट्रातील २० दर्जेदार नाट्यसंघ अभिनयाची पराकाष्ठा सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘आर्यरुप नाट्यनिर्मिती थिएटर्स’ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्वर्गीय आबांच्या स्मृतींना कलेच्या माध्यमातून अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
14 Feb 2026 10:17 AM (IST)
१५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक मोठी लढत होणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील हा सर्वात मोठा सामना असेल. दोन्ही संघ कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. या सामन्यापूर्वी टीम इंडिया कोलंबोमध्ये दाखल झाली आहे. त्यांच्या स्वागताचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. भारतीय संघाचे श्रीलंकेत पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान, हार्दिक पंड्या त्याच्या मैत्रिणीसोबत दिसला.
14 Feb 2026 10:09 AM (IST)
14 फेब्रुवारी म्हणजेच आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे चा उत्सव साजरा केला जात आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीदार एकमेकांना प्रेमाची कबुली देतात आणि आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचे वचन देतात. व्हॅलेंटाईन डे ला प्रेमाचा उत्सव देखील म्हटलं जातं. हाच प्रेमाचा उत्सव आता सर्च इंजिन गुगलने आणखी खास केला आहे. गुगलने त्यांच्या यूजर्ससाठी होमपेजवर एक खास डूडल सादर केलं आहे. गुगलने व्हॅलेंटाईन डे आणखी खास व्हावा यासाठी एक नवीन आणि सुंदर डूडल सादर केले आहे. या वर्षीचे डूडल प्रेमाच्या त्या अनोख्या पद्धतीला सलाम करते ज्यामध्ये लोक हाताने बनवलेल्या भेटवस्तू, वैयक्तिक नोट्स आणि स्वादिष्ट मिठाई देऊन त्यांचे नाते अधिक घट्ट करतात.
14 Feb 2026 10:01 AM (IST)
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी(१३ फेब्रुवारी) पहाटे कामगरांच्या दोन मजली इमारतीला भीषण आग (Fire Accident) लागली होती. या आगीत ३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषाचा समावेश आहे.
14 Feb 2026 09:35 AM (IST)
मुंबई: मुंबईच्या मानखुर्द येथून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणींकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. एव्हडेच नाही तर, तरुणी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती, मात्र तरुणाने या सगळ्याला नकार देताच तिने त्याला धमकी दिली. या घटनेने पीडित घाबरला होता. त्याने धाडस करून आपल्या कुटुंबियांना घडलेली घटना सांगितली. तेव्हा संपूर्ण प्रक्रर उघडकीस आला.
14 Feb 2026 09:30 AM (IST)
पुण्यातील भोसरी भूखंड व्यवहाराशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दोघेही मुंबईतील विशेष न्यायालयात हजर झाले, त्यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट (NBW) रद्द केले.
खासदार आणि आमदारांच्या प्रकरणांसाठी नियुक्त विशेष न्यायाधीश महेश जाधव यांनी गेल्या आठवड्यात हे वॉरंट जारी केले होते. आरोप निश्चितीच्या सुनावणीसाठी खडसे दाम्पत्य न्यायालयात उपस्थित न राहिल्याने ही कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी दोघेही प्रत्यक्ष न्यायालयात हजर झाल्याने हे वॉरंट मागे घेण्यात आले.
14 Feb 2026 09:25 AM (IST)
राज्यातील सर्वात मोठ्या ‘मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्स्पो २०२६’ या सौर ऊर्जा प्रदर्शनाचे उद्घाटन आज महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. शिवाजीनगर येथील न्यू अॅग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड येथे सुरू असलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर नागपुरे यांनी पुण्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय असल्याचे सांगितले. बदलत्या हवामान परिस्थिती आणि वाढत्या ऊर्जा गरजांच्या पार्श्वभूमीवर शहरात व्यावहारिक व अंमलात आणता येण्याजोगे सौर प्रकल्प राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
14 Feb 2026 09:20 AM (IST)
Mafia Queens of Mumbai: हिंदी चित्रपटसृष्टीचा वास्तविक जगातील गुन्हेगारी कथांशी नेहमीच जवळचा संबंध राहिला आहे. मुंबईच्या डोंगरी भागापासून ते दुबईपर्यंत विस्तारलेल्या अंडरवर्ल्डने सिनेमाला अशी अनेक पात्रे आणि कथानके दिली आहेत, ज्यांनी प्रेक्षकांवर खोल छाप सोडली आहे. सध्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित “ओ रोमियो” या चित्रपटामुळे हुसेन उस्तारा हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर ‘उस्तारा’ नावाच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट पूर्णपणे ‘बायोपिक’ नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, त्यातील व्यक्तिरेखा आणि पार्श्वभूमी हुसेन उस्तारा यांच्या जीवनाशी मिळतीजुळती आहे. त्यामुळेच जुन्या अंडरवर्ल्डमधील हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
14 Feb 2026 09:17 AM (IST)
राज्यभरातील सुपारीचा व्यापार, वाहतूक आणि त्यादरम्यान होणारे अन्न व औषधी प्रशासनाचे (FDA) छापे सध्या वादाचा विषय ठरत आहेत. या प्रशासकीय कारवाईच्या आड अनेक संशयास्पद व्यवहार होत असल्याची चर्चा आहे. सुरुवातीला छापे टाकून सुपारी निकृष्ट दर्जाची असल्याचे घोषित करायचे आणि त्यानंतर 'अर्थपूर्ण' तडजोडीनंतर तीच सुपारी चांगल्या दर्जाची असल्याचे प्रमाणित करायचे, असा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. औषध दुकानांच्या परवान्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी राजरोसपणे आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप होत आहेत.
14 Feb 2026 09:13 AM (IST)
अजित पवार यांच्या निधनानंतर, त्यांच्याकडील उपमुख्यमंत्रिपद आणि उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच औकाफ ही महत्त्वाची खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. मात्र, राज्याचे वित्तखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या स्वतःकडे ठेवले आहे. यामुळे भाजपने राष्ट्रवादीकडून हे खाते काढून घेतल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण येत्या तीन ते चार महिन्यांत हे अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपवले जाणार असल्याचे समजते.
14 Feb 2026 09:07 AM (IST)
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या काही वर्षांतील विश्वचषकातील सामन्यांच्या तुलनेत, उद्या होणाऱ्या टी-२० विश्वचषकातील सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या उत्कंठेचे मुख्य कारण सामन्यापूर्वी झालेला मोठा वाद हे आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यावर आता निसर्गाची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्याबाबत हवामान विभागाने इशाराही दिला आहे. जर पाऊस झाला, तर चाहत्यांच्या उत्सवावर विरजण पडण्याची दाट शक्यता आहे.
14 Feb 2026 09:03 AM (IST)
मुंबई : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत आला आहे. मात्र, या दोन्ही पक्षाचे विलिनीकरण लांबण्याची शक्यता आहे. असे असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. ‘जर आज अजित पवार जिवंत असते तर पक्षातील दोन्ही गट विलीन झाले असते. अजित पवारांनी १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत १२ फेब्रुवारी ही दोन्ही गटांच्या विलीनकरणाची तारीख निश्चित केली होती’, असे खासदार सुळे म्हणाल्या.
14 Feb 2026 08:55 AM (IST)
जगभरात कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक कायमच जंक फूडचे सेवन करतात. याशिवाय अपुरी झोप, कामाचा वाढलेला ताण, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा थेट परिणाम शरीरावर होतो. तसेच तरुणांमध्ये आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पूर्वीच्या काळी कॅन्सर किंवा हृद्यासंबंधित गंभीर आजार वयाच्या ५० व्या वर्षानंतर व्हायचे. पण हल्ली तरुण वयातील मुलांमुलींना सुद्धा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण होते. शरीराच्या अंतर्गत अवयवांना कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. मात्र कालांतराने लक्षणे वाढतात आणि शरीराला हानी पोहचते.
Gold Rate Today: भारतात 14 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,577 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,279 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,683 रुपये आहे. भारतात 14 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,42,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,55,770 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,16,830 रुपये आहे. भारतात 14 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 279.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,79,900 रुपये आहे.






