अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच जोडलेली असते. वेगवेगळे फोटोशूट करून अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर शेअर करत असते. तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनात एक खास जागा तयार केली आहे. अशा सुंदर आणि आकर्षक लुकमध्ये फोटोज शेअर करून अभिनेत्री चाहत्यांच्या हृदयावर जणू कब्जाच करत आहे.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने शेअर केले तिचे आकर्षक फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री श्वेत रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसून येत आहे. कपड्यावर छानशी रंगीत नक्षी आहे.
तिचा हा आऊटफिट खरचं फार आकर्षक आहे. गळ्यामध्ये नेकलेस, सुंदर हेअरस्टाईल, तांबूस डोळे आणि लोकांना घायाळ करणारी नजर असे हे लुक इन्स्टावर फार पाहिले जात आहे.
"ओठ गुलाबी, गाल गुलाबी, रूप में ना कसर जरा भी" अशी तिच्या सौंदर्याची ख्याती आहे. कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये Rainbow (इंद्रधनुष्य) असे नमूद केले आहे. तसेच तिच्या लुकबद्दल माहिती दिली आहे.
आंषिका वर्माने स्टाइल्ड केले असून सलीम सय्यदने तिचे मेक अप केले आहे. तसेच अप्रतिम अशी दिसणारी आकर्षक हेअर स्टाईल आलिया शेखने केले आहे.