निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात फळांचे सेवन करणे अतिशय महत्वाचे आहे. फळांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पपई खायला खूप जास्त आवडतो. पपईमध्ये असलेले विटामिन सी आणि इतर पोषक घटक आढळून येतात. पपई प्रत्येक ऋतूत शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी मदत करते. अनेक लोक सकाळच्या नाश्त्यात किंवा सॅलड म्हणून पपईचे सेवन करतात.म्हणूनच आज आम्ही रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. (फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित करा वाटीभर पपईचे सेवन
पपईमध्ये असलेले पपेन नावाचे एंजाइम आढळून येतात. यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात. पपईमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आढळून येते, यामुळे अपचन किंवा गॅस, ऍसिडिटीची समस्या उद्भवत नाही.
वाढलेले वाण कमी करताना आहारात पपईचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात पपईचे सेवन केल्यास महिनाभरात वजन कमी होण्यास मदत होईल. पपई खाल्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते.
पपईमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, विटामिन सी आणि विटामिन ई आढळतात. यामुळे त्वचा कायमच फ्रेश आणि हायड्रेट दिसते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला पपईचा फेसपॅक तयार करून त्वचेवर लावतात.
पपईमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी पपई प्रभावी आहे.
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही पपई खाऊ शकता. पण अतिप्रमाणात पपई खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीराला हानी पोहचू शकते.