निरोगी आरोग्यासाठी फळे खाणे अतिशय महत्वाचे आहे. फळांचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच कायमच मजबूत राहते. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर अनेक वेगवेगळ्या फळांचे सेवन केले जाते. त्यामध्ये तुम्ही ड्रॅगन फ्रुटचा सुद्धा समावेश करू शकता. किमतीने महाग असलेले ड्रॅगन फ्रुट चवीला अतिशय सुंदर लागते. यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवताना तुम्ही सकाळच्या नाश्त्यात ड्रॅगन फ्रूटचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया ड्रॅगन फ्रुट खाण्याचे गुणकारी फायदे. (फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर नियमित करा कमी कॅलरीज युक्त ड्रॅगन फ्रूटचे सेवन
ड्रॅगन फ्रुटमध्ये कमी कॅलरीज आणि इतर आवश्यक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही नियमित ड्रॅगन फ्रूटचे सेवन करू शकता. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहील.
ड्रॅगन फ्रुटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक्स इत्यादी अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शरीरात वाढलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी ड्रगन फ्रुट अतिशय प्रभावी आहे.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट खावे. या फळामध्ये अतिशय कमी साखर असते. त्यामुळे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही ड्रॅगन फ्रुट खाऊ शकता.
ड्रॅगन फ्रुटमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गॅस, ऍसिडिटी आणि पित्ताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मदत होते.
ड्रगन फ्रुटमध्ये विटामिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात आढळून येतात. यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते.