सर्वच महिलांना साडी नेसायला खूप आवडते. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्न समारंभात जाताना महिला साडी नेसतात. साडी नेसल्यानंतर लुक खूप स्टायलिश आणि उठावदार दिसतो. मात्र बऱ्याचदा लग्नाला जाताना किंवा कोणत्याही कार्यक्रमानिमित्त नेमकी कोणत्या रंगाची साडी नेसावी, असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सणावाराच्या दिवसांमध्ये नेमकी कोणत्या रंगाची साडी नेसावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या रंगाची साडी परिधान केल्यास तुमचा लुक खूप रॉयल दिसेल. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नसराई किंवा इतर कार्यक्रमांमध्ये परिधान करा 'या' रंगाच्या साड्या
ऑफिसला जाताना किंवा सणावाराच्या दिवसांमध्ये तुम्ही डार्क पर्पल रंगाची साडी नेसू शकता. यामध्ये तुम्ही सिल्क, शिफॉन, जॉर्जेट, बनारसी, कॉटन फॅब्रिकमध्ये साडी नेसू शकता.
एमेरल्ड ग्रीन सर्वच रंगाच्या त्वचेवर अतिशय सुंदर दिसतो. त्यामुळे पार्टी किंवा लग्न समारंभात तुम्ही एमेरल्ड ग्रीन रंगाची सुंदर कॉटन किंवा शिफॉन फॅब्रिकमधील साडी नेसू शकता.
बरगंडी रंग सर्वच महिलांना खूप जास्त आवडतो. लग्नातील शालूपासून ते वापरातील साड्यांमध्ये सुद्धा बरगंडी रंगाची साडी परिधान केली जाते.
रॉयल ब्लु रंग बनारसी किंवा पैठणी साडीमध्ये अतिशय खुलून दिसतो. त्यामुळे तुम्ही सणावाराच्या दिवसांमध्ये या रंगाच्या साडीची निवड करू शकता.
सोनेरी रंग हा अतिशय रॉयल आणि स्टायलिश लुक देतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही सणाच्या दिवशी किंवा लग्नसभारंभात गोल्डन रंगाची साडी नेसू शकता.