कडक उन्हाळ्यात महिला नेहमी आरामदायी आणि शरीराला न टोचणारे कपडे घालण्यास जास्त प्राधान्य देतात. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. ऑफिसला जाताना किंवा इतर वेळी बाहेर जाताना नेमक्या कशी पद्धतीची साडी नेसावी? असे अनेक प्रश्न महिलांना पडतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरजरी साड्या न नेसता महिला अतिशय साध्या आणि अंगावर उठून दिसणाऱ्या साड्या परिधान करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्या फॅब्रिकच्या साड्या नेसाव्यात, ज्यामुळे तुमचा लुक अतिशय सूंदर आणि उठावदार दिसेल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
कडक उन्हाळ्यात सुंदर दिसण्यासाठी नेसा 'या' फॅब्रिकच्या आकर्षक साड्या
ऑर्गेंझा साड्यांचा ट्रेंड अजूनही सगळीकडे आहे. या साड्या नेसल्यानंतर तुमचा लुक अतिशय स्टयलिश आणि सुंदर दिसेल.
लग्न समारंभ किंवा पार्टीला जाण्यासाठी जॉर्जेटच्या साड्या योग्य पर्याय आहे. या साड्या अंगावर अतिशय सुंदर बसतात. वजनाने हलक्या असलेल्या साड्या कोणतीही महिला सहज नेसू शकते.
हल्ली बाजारात टिश्यू सिल्क साड्या मोठ्या प्रमाणावर फेमस झाल्या आहेत. या साड्या तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात किंवा ऑफिस पार्टीमध्ये नेसू शकता.
घामाच्या धारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी अनेक महिला या ऋतूमध्ये कॉटनच्या साड्या नेसण्यास जास्त प्राधान्य देतात. कॉटनच्या साड्या अंगावर अतिशय चापून चोपून बसतात.
उन्हाळ्यामध्ये भरजरी साड्या नेसण्याऐवजी शिफॉन फॅब्रिकच्या साड्यांची निवड करावी. या साड्या वजनाने अतिशय हलक्या असतात आणि अंगावर नेसल्यानंतर सुंदर दिसतात.