Shani Sade Sati 2025: ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करतील. शनीचा मीन राशीत प्रवेश होताच मेष राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू होईल. मीन राशीचा हा साडेसातीचा दुसरा टप्पा असेल तर मेष राशीसाठी हा पहिलाच टप्पा असेल. येणारे नवेवर्ष मेष राशीसाठी नक्की कसे जाणार आहे आणि याचा मेष राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होणार आहे याबाबत ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी सांगितले आहे. कुटुंब, करिअर, मुलंबाळं आणि आर्थिक स्थिती या गोष्टींवर शनिच्या साडेसातीचा नक्की काय परिणाम होईल आणि मेष राशीच्या व्यक्तींनी काय सांभाळावे याबाबत जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे नव्या वर्षात शनी ग्रह मीन राशीत प्रवेश करणार असून मेष राशीची साडेसातीदेखील सुरू होणार आहे. याचा नक्की काय परिणाम होणार जाणून घेऊया

शनीची साडेसाती म्हटलं की धसकीच भरते. मात्र संपूर्ण काळ खराब असत नाही. मेष राशीच्या साडेसातीचा हा पहिलाच चरण सुरू होणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तीनी सावध राहण्याची गरज आहे

सन 2025 पासून सुरू होणारी शनिची साडेसाती तुमच्या कौटुंबिक जीवनावरही परिणाम करेल. घरात वाद-विवाद वाढू शकतात. घरगुती वादामुळे मानसिक तणाव राहील. घरातील नकारात्मक ऊर्जा मानसिक समस्या वाढवू शकते. वडिलांशी विनाकारण वाद होऊ शकतात. मोठ्या भावासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो

जेव्हा शनिदेव वक्री होतील म्हणजेच जुलै ते नोव्हेंबर दरम्यान उलट गतीमध्ये असतील, तेव्हा त्या काळात अडचणी आणखी वाढू शकतात. या काळात आर्थिक आघाडीवर नुकसान होऊ शकते. पैशाचे व्यवहार विचारपूर्वक करावे लागतील. यासोबतच गुंतवणुकीच्या बाबतीतही सावध राहावे लागेल. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल

ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती सुरू होताच मेष राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. डोळ्यांशी संबंधित समस्या त्रास या काळात होऊ शकतात. पायाला दुखापत इत्यादी समस्या असू शकतात. त्यामुळे कोणत्याही शारीरिक समस्येच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका

सन 2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करताच मेष राशीवर साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल. मेष राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसातीची पहिली अवस्था फारशी चांगली नाही असे सांगितले जात आहे. या राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होईल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते.






