टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ने अनेक स्पर्धकांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे. या शोच्या नंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे आकस्मिक निधन झाले आहे. या कलाकारांच्या अकस्मात मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्री शेफाली जारीवाला हिचं नावसुद्धा अशाच कलाकारांच्या यादीत सामील झालं आहे. मात्र, शेफाली जरीवालापूर्वी देखील असे अनेक ‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक होते, ज्यांचा अचानक झाला. आवडत्या सेलिब्रिटीचा मृत्यू चाहत्यांसाठी धक्कादायक ठरला.
शेफालीसारखेच बिग बॉसचे ‘हे’ ६ स्पर्धकही अचानक जगातून निघून गेले, जाणून घ्या
'बिग बॉस १३'फेम अभिनेत्री शेफाली जारीवाला हिचं शुक्रवारी रात्री निधन झालं. अंधेरीतील गोल्डन रेंज नावाच्या इमारतीत शेफाली पती पराग त्यागीसोबत राहत होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर इमारतीचे वॉचमन शत्रुधन महतो यांनी काल रात्री जेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हाची घटना माध्यमांना सांगितली. रिपोर्ट्सनुसार, शेफालीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल आले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
'बिग बॉस १३'चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचं २०२१ मध्ये वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्याच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच छाप पाडली होती. सिद्धार्थच्या अकाली मृत्यूमुळे फक्त त्याच्या कुटुंबीयांनाच नाही तर त्याच्या सेलिब्रिटी मित्रांनाही आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
'बिग बॉस ७' फेम अभिनेत्री प्रत्युषा बनर्जी हिने २०१६ साली जेमतेम वयाच्या २४ व्या वर्षी आत्महत्या केली. तिचं चंचल आणि उत्साही व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलं होतं. तिच्या दुःखद निधनानं संपूर्ण टेलिव्हिजन क्षेत्र हादरून गेलं.
'बिग बॉस १०' मध्ये सहभागी झालेले स्वामी ओम यांचं २०२१ साली कोरोनामुळे निधन झालं होतं. ते कायमच शोदरम्यान त्यांच्या वादग्रस्त वागणुकीमुळे सतत चर्चेत राहिले होते.
'बिग बॉस १४' मधील स्पर्धक आणि भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचं २०२३ साली वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांची ऊर्जा आणि चिकाटी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली.
'बिग बॉस मलयाळम १' मधील स्पर्धक सोमदास चट्टन्नूर याचं २०२१ मध्ये कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मनमिळावूपणामुळे आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके होते. त्यांच्या मृत्यूने महामारीचा प्रभाव अधोरेखित झाला.
'बिग बॉस कन्नड ३' ची स्पर्धक जयश्री रामय्या हिने २०२० साली आत्महत्या केली होती. त्यांच्या हसण्या- बोलण्याने आणि उत्साहाने प्रेक्षकांना प्रभावित केले होते. त्यांच्या दु:खद निधनाने सर्वांनाच धक्का बसला.
'बिग बॉस २' मध्ये सहभागी झालेली स्पर्धक जेड गुडी हिचे २००९ साली कर्करोगामुळे (Cancer) निधन झाले. या सर्व कलाकारांची अनुपस्थिती नेहमीच जाणवत राहील. त्यांचं योगदान आणि आठवणी चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील.