शत्रू आपल्या घरात घुसला आहे पण काय त्यांचा सामना करण्यासाठी आपल्या देशाचे शूरवीर तयार आहेत? डिज्नी+ हॉटस्टार (Disney + Hotstar) तुमच्यासाठी मिलिटरी ड्रामा सिरीज ‘शूरवीर’ (Shoorveer) घेऊन येत आहे. नुकताच ‘शूरवीर’चा ट्रेलर लाँच (Shoorveer Trailer ) करण्यात आला. शूरवीरमध्ये भारतातील एलिट टास्क फोर्स, ज्यामध्ये देशावर येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी तीनही संरक्षक दलांचा समावेश असलेली, एक सुसज्ज तुकडी बनवण्यासाठीच्या रोमहर्षक प्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. जगरनॉट प्रॉडक्शन निर्मित, समर खान निर्मित आणि कनिष्क वर्मा दिग्दर्शित असून ही मालिका विशेष रूपाने डिज्नी+ हॉटस्टारवर १५ जुलैला येत आहे. अभिनेता मकरंद देशपांडे (Makarand Deshpande), मनीष चौधरी (Manish Chaudhary), रेजिना कॅसांड्रा, अरमान रल्हान, आदिल खान, अभिषेक साहा, अंजली बारोट, कुलदीप सरीन, आरिफ झकेरिया, फैसल रशीद, साहिल मेहता आणि शिव्या पठाणी हे दिग्गज कलाकार देशविघातक चोरट्या कारवाया, प्रखर लष्करी प्रशिक्षण, हवाई लढाई आणि बुद्धिमान योजना आदींवरील कथा सादर करण्यासाठी एकत्र आले असून महत्त्वाचे म्हणजे ही कथा आपल्याला या अभिजात सैनिकांमधील मानवी संबंधांची कथा सांगते.