गेल्या काही वर्षांपासून भारतासह जगभरात हिडन कॅमेरा लावण्याचे गैरप्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हॉस्टेल, हॉटेल, हॉटेल रूम, शॉपिंग मॉल किंवा अशा अनेक ठिकाणी हिडन कॅमेरा लावून गैरप्रकार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे हिजन कॅमेरे कुणालाही सहजासहजी दिसणार नाहीत, अशा ठिकाणी लावले जातात. हे हिडन कॅमेरे शोधण्यासाठी काही सोप्या ट्रीक्स फॉलो करा.
सोप्या ट्रीकने शोधा हॉटेल रुममधील हिडन कॅमेरे (फोटो सौजन्य pinterest)
जेव्हा तुम्ही हॉटेलमधील रूममध्ये चेक इन करता त्यावेळेस संपूर्ण खोलीत कुठे कॅमेरा आहे की नाही, याची खात्री करायला हवी. अनेकवेळा हिडन कॅमेऱ्यातून बारिक आणि अंधुक लाल लाईट चमकत असते.
साधारणपणे, टीव्हीच्या मागे, ड्रेसिंग टेबलच्या मागे, लाईटच्या मागे, एसीच्या आजूबाजूला छुपे कॅमेरे असू शकतात. याशिवाय खोलीत काही फोटो किंवा पेंटिंग असेल तर त्याच्या मागे कॅमेरा असू शकतो.
तुमच्या मोबाईलचा फ्लॅश लाईट लावा आणि खोलीचा प्रत्येक कोपरा तपासा. असे म्हटले जाते कारण जर छुपे कॅमेरे असतील तर ते फ्लॅश लाइटमध्ये चमकतील.
अनेकदा काही हिडन कॅमेरे हे वायफायशी कनेक्ट असतात. त्यासाठी हिडन कॅमेरे शोधणारे अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेहमी डाऊनलोड करून ठेवा.
खोलीतील किंवा वॉशरूममधील लाईट बंद करून तेथील आरशावर मोबाईल टॉर्च लावा. त्यात कॅमेरा नसेल तर फक्त लाईट चमकेल किंवा कॅमेरा असेल तर ते लगेच दिसेल.
आरशाला बोटानं स्पर्श करून पाहा, त्यात बोटांची सावली आणि बोटांमध्ये गॅप असेल तर ठिक आहे, पण जर त्यात तफावत असेल तर त्याठिकाणी हिडन कॅमेरा असण्याची शक्यता असते.