जगातील प्रत्येक देशात शेतीला प्रचंड महत्त्व दिलं जातं. आपण सूर्य आणि चंद्राशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण शेतीशिवाय एखाद्या देशाची कल्पना करू शकत नाही. पण जगात असा एक देश आहे, ज्या ठिकाणी एकही शेती नाही. हा देश अत्यंत प्रगत आणि जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. मात्र या देशात धान्य पिकवलं जात नाही. कारण इथे एकही शेतजमीन नाही. चला तर या देशाबद्दल अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य - pinterest)
आश्चर्यकारक! या देशात प्रगती आहे पण एकही शेती नाही, कसा होतो धान्याचा पुरवठा? जाणून घ्या
जगात असा एक देश आहे जिथे तुम्हाला एकही शेती पाहायला मिळणार आहे. आम्ही सिंगापूरबद्दल बोलत आहोत. या ठिकाणी एकही शेती नाही. मात्र देखील या देशात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही.
सिंगापूर जगातील सर्वात लहान देशांपैकी एक आहे. त्याचे क्षेत्रफळ 735 चौरस किलोमीटर आहे. सिंगापूर हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे एकही शेत नाही.
सिंगापूर आशियातील चौथी आणि जगातील नववी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. येथे उंच इमारती आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत.
सिंगापूरमध्ये कच्चा माल इतर देशांतून पुरविला जातो. येथील अन्न, फळे, भाजीपाला इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे.
सिंगापूरमध्ये पाणी मलेशियातून येते, दूध, फळे आणि भाज्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातून येतात. सिंगापूरची डाळ, तांदूळ आणि इतर गरजा थायलंड आणि इंडोनेशियाकडून भागवल्या जातात.
सिंगापूरमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. सिंगापूरच्या कंपन्या परदेशी गुंतवणुकीसाठी ओळखल्या जातात.