सावनी रविंद्रने आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांच्या मनावर ‘मनमोही’नी घातली आहे हे खरं आहे आणि आता तिच्या गाण्यात सावनी रवींद्रच्या अभिनयाची जादूही उमटवताना दिसून येत आहे. अभिजित खांडकेकरसोबत तिची मनमोहक केमिस्ट्री जुळली असून तिचे हे नवे गाणे सर्वांनाच भारावून टाकत आहे. सावनी फॅशनच्या बाबतीतही मागे नाही. तिने नुकतेच कांजीवरम साडीतील काही फोटो पोस्ट केले असून तिचा हा लुक चाहत्यांसाठी नक्कीच एक पर्वणी आहे. पारंपरिक कांजीवरम साडीतील सावनीच्या अदा चाहत्यांच्या हृदयामध्ये एक वेगळी जागा निर्माण करत आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. पहा सावनी रविंद्रचा हा मनमोहक लुक (फोटो सौजन्य - Instagram)
सावनी रविंद्रच्या गाण्यासह तिच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत आणि तिची स्टाईलही क्लास आहे. साडीतील तिचे हे मनमोहक रूप कसे आहे आपण पाहूया
सावनीने निळ्या रंगाची कांजीवरम साडी नेसली असून त्यासह गुलाबी रंगाचा ब्लाऊज मिसमॅच केलाय, ज्यामुळे तिच्या फॅशन सेन्सची सर्वांनाच कल्पना येतेय
या साडीसह तिने पारंपरिक मोत्यांचा चोकर, कानातले, ठसठशीत नथ आणि हातात गुलाबी बांगड्या घातल्या आहेत. कांजीवरम साडीवरील तिचा हा लुक अधिक क्लासी आणि उठावदार दिसतोय
हेअरस्टाईल करताना तिने आंबाडा बांधला असून त्यात गुलाबी रंगाचे गुलाब माळले आहेत आणि आपला लुक पूर्ण केलाय. तिचा हा मराठमोळा पेहराव आणि स्टाईल सर्वांनाच भावली आहे
कपाळावर लाल रंगाची लहानशी चंद्रकोर तिच्या सौंदर्यात आणि स्टाईल स्टेटमेंटमध्ये भरच घालताना दिसत आहे. मराठमोळा असा तिचा लुक या टिकलीने पूर्ण केलाय
या सगळ्यात तिचा मेकअप म्हणजे अगदी सटल असून फाऊंडेशन बेस, हायलायटर, काजळ, आयलायनर, आयशॅडो आणि गुलाबी रंगाची लिपस्टिक लावत तिने पूर्ण केलाय. तिच्या स्माईलमुळे सौंदर्याला चारचाँद लावले असल्याचे दिसून येत आहे