पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑगस्ट रोजी 3 नवीन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. या तीन ट्रेन चेन्नई ते नागरकोइल, मदुराई ते बेंगळुरू आणि मेरठ ते लखनऊ दरम्यान धावतील. त्यामुळे आता देशभरात आता 102 वंदे भारत ट्रेन धावत असून, या गाड्यांमधून 3 कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे. अशातच आता पुढील तीन महिन्यांमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
बिनधास्त झोपा... वंदे भारत स्लीपरचा फर्स्ट लूक समोर; पाहा... हायस्पीड लक्झरीयस ट्रेनचे ५ फोटो
वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला असून, कर्नाटकच्या बंगळुरू येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनची पाहणी केली आहे.
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) सुविधेमध्ये वंदे भारत स्लीपर कोचच्या प्रोटोटाइपचे अनावरण रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
दरम्यान, भगव्या रंगात ही पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पाहायला मिळाली असून, लक्झरीयस लूक आणि आरामदायी व्यवस्था या ट्रेनमध्ये असल्याचे दिसते.
स्लीपर ट्रेनमध्ये बर्थ सीट व्यवस्थाही अफलातून असून प्रवाशांना सर्वोतोपरी आरामदायी सुविधा देण्यात येणार असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे ट्रेनमधील टायलेटची सुविधाही उत्कृष्ट अन पाश्चिमात्य कमोड पद्धतीची आहे.