जीवनाचा आनंद घ्यायला वयाची मर्यादा नसते. आपण प्रत्येक क्षण आनंदात जगायचे असेल तर फक्त आपले मन तरूण असायाला हवे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 90 वर्षांची ही मॉडेल. अमेरिकेतील स्टायलिस्ट डीने तिच्या 90 वर्षांच्या आजीलाच मॉडेलिंगमध्ये उतरवून एक नवा इतिहास रचला आहे. वयाच्या जोखडात अडकलेल्या फॅशनच्या जगाला झुगारत तिने तिच्या आजीच्या माध्यमातून फॅशनचा नवा अर्थ समोर आणला आहे. या अनोख्या फोटोशूटमध्ये मार्गारेट च्या आजीने, रंगीबेरंगी कपडे, चमकणाऱ्या ॲक्सेसरीज, उंच टाच, स्टायलिश चष्मे आणि अगदी सिगारसह नवनव्या स्टाइल्स सादर केल्या आहेत. या 90 वर्षाच्या महिलेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.( फोटो सौजन्य: legendary_glamma इन्स्टाग्राम)
90 वर्षाच्या महिलेचा ग्लॅमरस लुक

फोटोशूटमध्ये मार्गारेटने विविध प्रकारचे ट्रेंडी आणि आकर्षक कपडे आणि ॲक्सेसरीजमध्ये परिधान केलेले तुम्ही पाहू शकता. प्रत्येक फोटोमध्ये तिने आपला लूक आणि पोज अशा पद्धतीने मांडले आहे अनेकजण पाहून दंग आहेत.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, वृद्ध महिलेने सोनेरी चमकदार ड्रेस, सिक्विन आणि फ्रिंजने सजवलेले जाकीट, उंच टाच आणि चष्मा घातला आहे. मार्गारेट या ग्लॅम लुकमध्ये सुपर कूल व्हाईब्स देत आहे

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, लाल रांगच्या फॅशनेबल ड्रेस, गॉगल तसेच काळ्या रंगाचा बॅगी ड्रेस त्यावर गोल्ड ऍक्सेसरीज, तसेच ब्लॅक आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये हटके लूक केला आहे.

पहिल्या फोटोमध्ये बॅगी पँट, पर्ल ब्रॅलेट, लेदर रॅप्ड ड्रेस आणि ओटीटी फॅक्टर असलेले ॲक्सेसरीज, तर दुसऱ्या फोटोमध्ये डोक्यावर मुकुट, हातात तंबाखूची पाईप, गळ्यात साखळी, असा लुक तुम्ही पाहू शकता.

90 वर्षाच्या आजीचे हे लुक @luxurymediazambia ने स्टाईल केलेले आहेत.

या फोटोज ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.






