आंबट गोड चव असलेले अननस लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. अननसामध्ये असलेले पौष्टिक घटक आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहेत. अननसामध्ये विटामिन सी तसेच विटामिन बी 6, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, रिबोफ्लेविन, तांबे, पोटॅशियम आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. तसेच अननसाचे सेवन केल्यास बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्वचा आणि आरोग्यसाठी सुद्धा अननस फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला अननसाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
अननस खाण्याचे फायदे
अननसाचे सेवन केल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो.अननसात भरपूर प्रमाणात मँगनीज आढळून येते. ज्यामुळे स्नायूंचे दुखणे थांबते.
फायबर युक्त अननस खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊन हृदय निरोगी राहते.
रिकाम्या पोटी अननस खाल्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी मदत करते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अननसाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अननसमध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
अननसापासून अनेक पदार्थ बनवता येतात. अननसाचा रस, केक, पुडिंग इत्यादी अनेक पदार्थ तुम्ही बनवू शकता.