गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live Trailer) चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सचित पाटील (Sachit Patil), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), हेमांगी कवी (Hemangi Kavi), पुष्कर जोग (Pushkar Jog), नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या १५ जुलै रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.यापूर्वीच चित्रपटाच्या संगीताची रसिकांवर भुरळ पडली आहे. आता ट्रेलरही प्रेक्षकांना आवडत असून हा काहीतरी भन्नाट विषय असल्याचे दिसतेय. यात सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत आहेत. व्यावसायिक कारकिर्दीत आपण किती वरचढ आहोत, हे दाखवण्यात त्यांची चढाओढ सुरु असून त्यात ‘ब्रेकिंग न्यूज’साठीची त्यांची धडपड, स्पर्धा यात अधोरेखित होत आहे.