जगभरात महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून पैठणी साडी प्रसिद्ध आहेत. जगभरातील सर्वच स्त्रियांना पैठणी साडी नेसायला खूप जास्त आवडते. साडीवरील नक्षीकाम, आकर्षक डिझाईन, रेशमी धाग्यांचा वापर इत्यादी गोष्टींमुळे सर्वच महिला पैठणी साडी घेण्यास प्रथम प्राधान्य देतात. लग्नसराईच्या दिवसांमध्ये सर्वच महिला पारंपरिक लुक करतात. अशावेळी पैठणी साडी नेसून त्यावर मराठमोळे दागिने घातले जातात. पैठणी साडीचा पदर आणि अस्सल रेशमी धाग्यांचा वापर पाहून साडी खरेदी केली जाते. चला तर पाहुयात पैठणी सदिच्याबी पदरावरील काही आकर्षक डिझाईन.(फोटो सौजन्य – pinterest)
पैठणी साडीवर आकर्षक पदर सौंदर्यात पाडतील भर, चारचौघांमध्ये दिसाल सुंदर

पैठणी साडीवरील पोपट अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. पैठणी साडी कोणत्याही सणावाराच्या दिवसांमध्ये नेसता येते.

पैठणी साडीच्या काठावर प्रामुख्याने मोराची डिझाईन असते. तसेच साडीच्या आतील पदरावर सुद्धा सुंदर मोराचे नक्षीकाम करून दिले जाते. लग्नसराईत नेसण्याच्या साडीवर मोराची डिझाईन तयार करून घेतली जाते.

साडीच्या काठावर लखलखणारे मोर अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात. पैठणी साडीवर करण्यात आलेली डिझाईन आणि मोराचे नक्षीकाम वर्षनुवर्षं तसेच टिकून राहते.

पारंपरिक पैठणी साडीवर वेगवेगळ्या फुलांच्या आणि आसवली डिझाईन केल्या जातात. सोन्याच्या जरीचा वापर करून बनवलेली पैठणी लग्नात नेसण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

लग्नात इतरांपेक्षा हटके आणि युनिक लुक हवा असल्यास तुम्ही या डिझाईनचा पदर पैठणी साडीवर तयार करून घेऊ शकता. यामुळे लग्नात तुमचा लुक उठावदार दिसेल.






