धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, आहारात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येते. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे हार्ट अटॅक किंवा उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजारांची शरीराला लागण होते. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात असंख्य बदल दिसून येतात. थकवा जाणवणे, अशक्तपणा, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे हार्ट अटॅक आणि हृद्यासंबंधित आजारांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. हार्ट अटॅक आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी आहारात नायट्रेटयुक्त कोणत्या भाज्यांचा समावेश करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
हार्ट अटॅक आणि उच्च रक्तदाबाचा धोका होईल कमी! आहारात करा नायट्रेटयुक्त 'या' भाज्यांचा समावेश

दैनंदिन आहारात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बीटच्या रसाचे सेवन करावे. बीट खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. यामध्ये खूप जास्त नायट्रेट असते.

लोहाने समृद्ध असलेल्या पालकचे नियमित किंवा आठवड्यातून दोनदा सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहील आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होईल. हृदयाचे स्नायू मजबूत करण्यासाठी पालक खावे.

फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स युक्त कोबीच्या भाजीचा आहारात समावेश केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे धमन्यांमध्ये साचून राहिलेली चरबी नष्ट होण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात नायट्रेट असते. त्यामुळे सॅलड बनवताना त्यात लेट्यूसचा समावेश करावा. लेट्यूस हृदयाच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करावा. मेथीच्या पानांची भाजी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा तुम्ही मेथीच्या भाजीचा आहारात समावेश करू शकता.






