केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्पीय बजेट सादर केला. हा त्यांचा सलग नववा विक्रमी अर्थसंकल्प होता. यंदाच्या बजेटला त्यांनी हाताने विणलेली मरून रंगाची कांजीवरम कट्टम साडी परिधान केली होती. साडीवर पिवळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि हातमागावर विणलेली शाल सुद्धा परिधान केली आहे. दरवर्षी बजेटला त्यांनी नेसलेल्या साड्या चर्चेचा विषय ठरतात. भारतातील पारंपारिक विणकामांना प्रसिद्धी आणि आकर्षण मिळावे तसेच हातमाग उद्योगाला चालना मिळवा, यासाठी निर्मला सीतारमण कायमच हातमागावरील साड्यांची निवड बजेटसाठी करतात. त्यांनी परिधान केलेली शाल हे केवळ कापड नसून भारताच्या परंपरेचा संदेश आहे. चला तर जाणून घेऊया निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेल्या शालीची खास वैशिष्ट्य. (फोटो सौजन्य – ANI)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेल्या शालीची 'ही' आहेत खास वैशिष्ट्य, सांस्कृतिक ओळखीचा संदेश

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करताना वेगवेगळ्या राज्यातील हातमागावर विणण्यात आलेल्या साड्यांची निवड करतात. या साड्या केवळ एक कापड नसून भारताच्या परंपरेचा, हस्तकलेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा नमुना आहे.

निर्मला सितारामण यांनी यंदाच्या वर्षी सलग नव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. भारतातील विविध राज्यांतील हातमाग, हस्तकला आणि स्थानिक विणकाम परंपरेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दरवर्षी त्या हातमागावरील साड्यांची निवड करतात.

यंदाच्या वर्षी निर्मला सीतारमण यांनी हातमाग साडीसोबतच हातमागावर विणकाम करून तयार करण्यात आलेली शाल सुद्धा परिधान केली होती. ईशान्य भारतातील सूक्ष्म नक्षीकाम करून तयार करण्यात आलेली शाल बजेटचे खास आकर्षण ठरली आहे.

अर्थसंकल्पाच्या दिवशी शाल परिधान करणे म्हणजे “लोकल ते ग्लोबल” विचारांना अधोरेखित करणे. त्यांनी कांजीवरम साडीवर वांगी रंगाची लोकरीची शाल घेतली होती. ही शाल केवळ थंडीपासून रक्षण करण्यासाठी नाहीतर दक्षिण भारतीय संस्कृती आणि जागतिक व्यापारातील भारताच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक आहे.

2025 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी मधुबनी पेंटिंगची साडी परिधान करत त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता.






