जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक विचित्र गोष्टी घडत असतात, ज्याची आपल्याला माहिती नाही. या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगातही बरेच लोक जुन्या परंपरांशी जोडलेले आहेत आणि त्यांचे पालनही करत आहेत. प्रत्येक ठिकाणी काही वेगळ्या परंपरा पाहायला मिळतात, अशातच आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात विचित्र आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रथांविषयी माहिती सांगणार आहोत. काही प्रथा तर इतक्या विचित्र आहेत, की त्यांविषयी ऐकूनच आपल्या अंगानर काटा येईल.
कुठे मृतदेहासोबत नाचतात तर कुठे मृतदेहाची बोट कापतात... या आहेत जगातील सर्वात विचित्र प्रथा
इंडोनेशियाचील दानी जमातीत एका विचित्र परंपरेचे पालन केले जाते. कुटुंबातील कोणत्या सदस्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या बोटाचा एक भाग काढून टाकला जातो. दुःख आणि आदर व्यक्त करण्याचा हा एक मार्ग मानला जातो. इथल्या सरकारने आता ही परंपरा बंद केली आहे मात्र आजही काही वडीलधारी ही परंपरा श्रद्धेने पाळतात
महाराष्ट्रात जेव्हा पाऊस पडत नाही किंवा कमी पाऊस पडतो, तेव्हा लोक भगवान इंद्राला प्रसन्न करण्यासाठी बेडकांचे लग्न आयोजित करतात. या परंपरेत लग्नाचे सर्व विधी पार पाडले जातात आणि नंतर बेडकांना तलावात सोडले जाते, जेणेकरुन पाऊस पडेल
मलेशिया आणि इंडोनेशियातील टिडोंग जमातीमध्ये एक विचित्र परंपरा साजरी केली जाते. यात नवविवाहित जोडप्याला तीन दिवस बाथरुम वापरण्याची परवानगी दिली जात नाही. असे केल्याने, त्याचे वैवाहित जीवन आनंदी आणि शांतीपूर्ण राहते अशी मान्यता आहे
चीनच्या काही भागात गर्भवती पत्नीला घेऊन जळत्या कोळशावर अनवाणी चालण्याची एक प्रथा आहे. असे केल्याने, पत्नीची प्रसूती सहज होते अशी मान्याता आहे. ही प्रथा शुभ मानली जाते आणि लोक ती पूर्ण भक्तीने पाळतात
मादागास्करच्या मालागासी जमातीला 'फमादिहान' नावाची एक अनोखी परंपरा आहे. यात दर सात वर्षांनी त्यांच्या पूर्वजांचे मृतदेह बाहेर काढले जातात आणि त्यांना नवीन कपडे घातले जातात. यामध्ये संगीताच्या तालावर कबरीभोवती नाचले जाते, लोक याला पूर्वजांचा आशिर्वाद मानतात