वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. केस कोरडे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस अचानक गळणे किंवा केसांसंबधित इतरही समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा महिला दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता केसांच्या वाढीकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. केस तुटण्यास किंवा गळण्यास सुरुवात झाल्यानंतर टक्कल पडेल की काय अशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी कोणत्या रसाचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमच्या केसांची वाढ झपाट्याने होईल. (फोटो सौजन्य – iStock)
औषधांपेक्षा प्रभावी ठरतील 'हे' गुणकारी रस, महिन्याभरात केसांची होईल झपाट्याने वाढ
गाजरचा रस प्यायल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि विटामिन ए भरपूर प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते.
कोरफडचा रस टाळूवरील कोंडा कमी करण्यासाठी मदत करतो. केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे काहीवेळा केस गळू लागतात, याशिवाय केसांच्या वाढीवर गंभीर परिणाम दिसून येतात. या समस्येपासून आराम मिळ्वण्यासाठी नियमित कोरफडचा रस प्यावा.
आरोग्यासाठी बीटचा रस अतिशय गुणकारी आहे. यामध्ये नायट्रेट्स आणि विटामिन सी इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते आणि त्वचा, केसांना अनेक फायदे होतात.
पालकच्या रसात लोह आणि फोलेट इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे नियमित सकाळच्या नाश्त्यात पालक काकडीच्या स्मूदीचे सेवन केल्यास शरीरासह केसांना अनेक फायदे होतात.
केसांच्या घनदाट वाढीसाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सकाळी उठल्यानंतर नियमित आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास त्वचेमधील कोलेजानचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.