उपवासाच्या दिवशी शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात किंवा आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन केले जाते. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीर कायमच तंदुरुस्त आणि मजबूत राहते. अनेक लोक हंगामी फळांचे सेवन करणे टाळतात. पण फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला श्रावण महिन्यात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांना सुद्धा अनेक फायदे होतील. (फोटो सौजन्य – istock)
श्रावण महिन्यात मिळणारी 'ही' फळे आरोग्यासाठी ठरतात वरदान
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात जांभळं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. जांभळाचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
श्रावण महिना सुरु झाल्यानंतर बाजारात सीताफळ उपलब्ध होतात. सीताफळापासून अनेक वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. पोषक तत्वांनी समृद्ध असलेले फळ आरोग्यसाठी गुणकारी आहे.
तिखट तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे बऱ्याचदा पोटाच्या समस्या उद्भवू लागतात. अशावेळी पोट स्वच्छ करण्यासाठी नियमित एक किंवा दोन सुके, ओले कोणतेही अंजीर खावे. कारण यामध्ये भरपूर फायबर आढळून येते.
आंबट गोड चवीचा पेरू लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पेरूचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये भरपूर फायबर असते.
उपवासाच्या दिवशी डाळिंबाचे दाणे खावेत. डाळिंब खाल्यामुळे शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहते. डाळिंबाचे दाणे शरीरात रक्त वाढवतात.