ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
Rishabh Pant’s comments on his return from injury: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या म्हणजेच १४ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी कोलकाता येथे खेळवली जाणार आहे. या मालिकेद्वारे उजव्या घोट्याच्या दुखापतीमुळे जवळजवळ चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. परतल्याबद्दल ऋषभ पंतने आनंद व्यक्त केला. पंत शुक्रवारी ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असणार आहे.
ऋषभ पंत मागील महिन्यात बेंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये भारत अ संघाचे नेतृत्व करून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला आहे. याआधी, पंतने बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याचे पुनर्वसन पूर्ण केले असून त्यानंतर त्याला निवडीसाठी तंदुरुस्त घोषित केले गेले.
हेही वाचा : अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन जोडीची क्लिप व्हायरल! न्यूयॉर्कमध्ये दिसले एकत्र; लग्नाच्या अफवांना बळ
बीसीसीआयकडून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत म्हणाला की, “दुखापतीतून परत येणे हे कधीही सोपे नसते. पण देव नेहमीच दयाळू राहिला असून त्याने मला आशीर्वाद दिला आहे, आणि यावेळी देखील मी परत आल्याबद्दल खूप आनंदी आहे.” ऋषभ पंत पुढे म्हणाला की, “पाहा, मी जेव्हा जेव्हा मैदानावर पाऊल ठेवत असतो तेव्हा मी एका गोष्टीसाठी कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी नेहमीच वर पाहतो आणि देवाचे, माझ्या पालकांचे, माझ्या कुटुंबाचे, मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानत असतो.”
२८ वर्षीय खेळाडूने त्याच्या पुनर्प्राप्तीदरम्यान तो कसा प्रेरित राहिलातसेच त्याने नकारात्मकतेवर कशी मात केली याबाबत आपले मत मांडले. पंत म्हणाला की, “मी एक गोष्ट करत असतो, ती म्हणजे माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे; नशीब ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला नियंत्रित करता येत नाही. म्हणून, मी त्याबद्दल विचार न करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण असे अनेक घटक असतात ज्याकडे आपण लक्ष देत नाही, परंतु जर तुम्ही तुमचे लक्ष फक्त तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला चांगले वाटेल अशा गोष्टी करत राहिल्यास, विशेषतः जेव्हा तुम्ही दुखापतीतून बाहेर पडत असतात तेव्हा, तुम्हाला आनंद मिळेल.”
हेही वाचा : IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती
ऋषभ पंत पुढे म्हणाला की, “फक्त अशा क्षेत्रात राहा जिथे तुम्हाला जास्त आरामदायी वाटेल, कठोर मेहनत करा, शिस्तबद्ध राहा आणि अशा क्षेत्रात राहा जिथे तुम्ही शिकण्यास नेहमी तयार असाल, पण सर्वकाही करताना त्या क्षणाचा आनंद देखील घ्या.” असे देखील पंत म्हणाला.






