बॉलीवूडमधून अनेक रंजक बातम्या समोर येत असतात. मग त्या बातम्या चित्रपटासंबंधित असूदेत किंवा मग अभिनेत्याच्या पर्सनल आयुष्याविषयी... इथे जितक्या लवकर लग्न होतात तितक्याच लवकर ते मोडतात. मात्र आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा एका घटस्फोटाविषयी माहिती सांगत आहोत वेगळे होण्याचे कारण काही अजबच होते. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा परस्पर मतभेदांमुळे हा घटस्फोट झाला नाही तर एका कुत्र्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. तुमचा विश्वास बसणार नसला तरी हे खरे आहे. हा नक्की कोणता अभिनेता आहे चला जाणून घेऊया.
ना कोणते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ना कोणते मतभेद... या अभिनेत्याचा पाळीव कुत्र्यांमुळे मोडला तीन वर्षांचा संसार
आम्ही इथे ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, त्याला त्याच्या पाळीव कुत्र्यांवर इतके प्रेम आहे की त्याने लग्नाच्या अवघ्या 3 वर्षातच त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. या कुत्र्यामुळे दोघांमध्येही वाद व्हायचे, याचा परीणाम असा झाली की दोघांनेही एके दिवशी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या अभिनेत्याचे नाव आहे अरुणोदय सिंग.
2016 मध्ये अरुणोदय सिंग याने कॅनडाच्या ली एल्टनशी लग्नगाठ बांधली. त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच त्यांच्यात मतभेद सुरू झाले. ली एल्टनला कुत्र्यांच्या भुंकण्याने आणि आवाजाने त्रास होऊ लागला, तर अरुणोदयला त्याच्या पाळीव प्राण्यांची खूप ओढ लागली. या मुद्द्यावरून दोघांमध्ये दररोज वाद व्हायचे ज्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव वाढला
त्याचवेळी अरुणोदय सिंग आपल्या कुत्र्यांपासून वेगळे व्हायला तयार नव्हता. हळूहळू हा वाद इतका वाढला की त्यांच्यातील दुरावा वाढत गेला आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कुत्र्यांवरून सुरू झालेले हे भांडण इतके वाढले की लग्नाच्या 3 वर्षांतच 2019 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला
अरुणोदय यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली, ती मंजूर झाली आणि त्यांचे नाते अधिकृतपणे संपुष्टात आले. हा घटस्फोट बॉलिवूडमधील अनोख्या घटस्फोटांपैकी एक मानला जातो. अरुणोदय सिंग हा 42 वर्षांचा आहे आणि त्यांनी अजूनही दुसरे लग्न केलेले नाही
घटस्फोटानंतर ते त्यांच्या आयुष्यात पुढे गेले, परंतु त्यांनी त्यांचे पर्सनल आयुष्य नेहमीच खाजगी ठेवले. तो सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी त्याच्या अकाऊंटवर त्याच्या कुत्र्यांची छायाचित्रे अनेकदा पाहायला मिळतात. चित्रपटांसोबतच त्याने ओटीटीवरही चांगले काम केले आणि त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले. अभिनेत्याने 2009 मध्ये 'सिकंदर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला