सिंह जंगलाचा राजा आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. सिंहासमोर कोणत्याही प्राण्याचा निकाल लागणं कठीण आहे. कारण सिंहाची ताकद इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा सर्वात जास्त मानली जाते. सिंह ताकदवान असल्यासोबतच एक कुशल शिकारी देखील आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की सिंहाला कोणी हरवू शकत नाही. असे काही प्राणी आहेत, जे सिंहाला अगदी सहज टक्कर देऊ शकतात. या प्राण्यांसोबत पंगा घेणं सिंहाला महागात पडू शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
या प्राण्यांसोबत पंगा घेणं सिंहालाही पडू शकतं महागात, क्षणातच जंगलाच्या राजाला टाकतात फाडून...
सिंहाचा सर्वात मोठा शत्रू दुसरा सिंहच असतो. आपले वर्चस्व कमी होऊ नये या कारणासाठी एक सिंह अनेकदा दुसऱ्या सिंहाशी भिडतो.
तरस प्राण्यासोबत पंगा घेणं सिंहाला महागात पडू शकतं. बऱ्याच वेळा तरस सिंहाशी भिडतो. तरस त्याच्या कळपासोबत असतात येतो तेव्हा तो सिंहासारख्या शक्तिशाली प्राण्यालाही धडा शिकवू शकतो.
भलामोठा हत्ती देखील सिंहासाठी संकट बनू शकतो. असे म्हटले जाते की सिंह हत्तींशी पंगा घेत नाही, परंतु कधीकधी या दोन प्राण्यांमध्ये भयंकर चकमकी पाहायला मिळतात.
म्हशी खूप शांत आणि सुस्त दिसत असल्या तरी, जेव्हा त्या संकटात असतात तेव्हा त्या सर्वात भयानक रूप धारण करतात आणि सिंहासारख्या प्राण्यांनाही हरवू शकतात.
पाणघोडा मांस खात नसला तरी त्याच्या मोठ्या जबड्यामुळे तो फार धोकादायक ठरू शकतो. मोठ्या जबड्यांमुळे ते सर्वात मजबूत वस्तूंनाही तोडू शकतात.
मार्शल ईगलच्या पंखांचा विस्तार सुमारे 6 फूट आहे. याशिवाय, ते स्वतःच्या आणि मुलांची सुरक्षा करण्यासाठी सिंहाशी पंगा घेऊ शकतात.