तुम्हालाही नवनवीन दर्जेदार चित्रपट पाहायला आवडत असतील तर आज आम्ही तुम्हाला अशा एका ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने बॉक्स ऑफिसवर 100 आठवडे राहण्याचा जबरदस्त रेकॉर्ड बनवला. हा चित्रपट 50 वर्षांआधी रिलीज झाला होता मात्र आजही याची जादू जशीच्या तशीच आहे. आजपर्यंत या चित्रपटाचा हा विक्रम इतर कोणताही चित्रपट मोडू शकलेला नाही. चला या चित्रपटाविषयी काही सविस्तर गोष्टी जाणून घेऊयात.
या चित्रपटाने 50 वर्षांपूर्वी रचला इतिहास! 100 आठवडे होती फक्त याचीच हवा; प्रचंड कमाईसह आजही रेटिंग 10 पैकी 8
आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो 50 वर्षांपूर्वी म्हणजेच 1975 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर 100 आठवडे वर्चस्व गाजवले होते. एवढेच काय तर तुम्हाला माहिती आहे का? याच चित्रपटातून अमिताभ बच्चन सुपरस्टार बनले होते
हा चित्रपट इतका कमाल होता की त्याने केवळ विक्रमच मोडले नाहीत तर चित्रपटसृष्टीत नवीन इतिहासही रचला. आपण बोलत आहोत 21 जानेवारी 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या 'दीवार'बद्दल. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते
चित्रपटात शशी कपूर, अमिताभ बच्चन, निरुपा रॉय, नीतू सिंग आणि परवीन बाबी सारखे दिग्गज कलाकार दिसून आले . 50 वर्षे पूर्ण झालेल्या त्या काळातील अविस्मरणीय चित्रपटांपैकी हा एक आहे. प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट 100 आठवडे थिएटरमध्ये राहिला आणि याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा देखील कमावला
या चित्रपटाची कथा प्रसिद्ध लेखक सलीम-जावेद यांनी लिहिली होती. या चित्रपटाची खासियत म्हणजे केवळ त्याची कथा आणि अभिनयच नाही तर त्यातील गाण्यांनीही लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आपले एक विशेष स्थान निर्माण केले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट 1.3 कोटी रुपये होते, ज्याने बॉक्स ऑफिसवर 7.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. आजही हा चित्रपट बॉलीवूडच्या आयकॉनिक चित्रपटांमध्ये गणला जातो, ज्याचे IMDb रेटिंग 10 पैकी 8 आहे