Smartphone Tricks: आपण आपला स्मार्टफोन अनेक कामांसाठी वापरतो. चॅटिंग, कॉलिंग, व्हिडीओ, फोटो अशा अनेक कामांसाठी आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर करतो. पण एवढी सर्व कामं ज्या स्मार्टफोनवर केली जातात, पण कधी कधी या स्मार्टफोनचा स्पीकर खराब होऊ शकतो आणि आणि आपल्याला व्हिडीओ किंवा कॉलिंगमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. पण आता काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही या समस्या सोडवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: तुमच्याही स्मार्टफोनचा स्पीकर खराब झालाय? आवाज येत नाही? या 5 ट्रिक्स करतील मदत
येथे आम्ही तुम्हाला 5 सोप्या ट्रिक्स सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनचा स्पीकर स्वतः स्वच्छ आणि बूस्ट करू शकता आणि तेही कोणत्याही खर्चाशिवाय.
अनेकदा स्पीकरचा आवाज कमी असण्याचे कारण फक्त धूळ असते. मऊ ब्रश, टूथब्रश किंवा सेफ्टी पिनने स्पीकर ग्रिल हळूवारपणे स्वच्छ करा.
जर ते ब्रशने स्वच्छ होत नसेल, तर तुम्ही एअर ब्लोअर वापरू शकता किंवा स्पीकर ग्रिलवर सेलोटेप चिकटवू शकता आणि हळूवारपणे ओढू शकता.
प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवर अनेक "स्पीकर क्लीनर" अॅप्स उपलब्ध आहेत जे ध्वनी लहरींद्वारे स्पीकरमधील घाण काढून टाकण्यास मदत करतात.
तुमच्या फोनच्या साउंड सेटिंग्जमध्ये जा आणि "साउंड एन्हान्सर", "डॉल्बी अॅटमॉस" किंवा "ऑडिओ बूस्टर" सारख्या सेटिंग्ज चालू करा.
कधीकधी फोन कव्हर स्पीकर ब्लॉक करतो, ज्यामुळे आवाज दाबला जातो. एकदा कव्हरशिवाय फोन वापरून पहा.