पाठीचा कणा मजबूत असेल किंवा पाठीचा कणामध्ये जास्त पोक आलेला नसेल, तर समजून जा कि तुम्ही निरोगी आहात. तुम्ही खूप फिट आहात. पाठीचा कणा मजबूत असणे फार महत्वाचे असते. विशेष म्हणजे हे आत्मविश्वास वाढवण्याचेही काम करते. तुमच्या पाठीच्या कणाला मजबूत करण्यासाठी तसेच शरीर अगदी इलॅस्टिकसारखे लवचिक करण्यासाठी ही योगासने नक्की करा.
पाठीचा कणा मजबूत करतील 'ही' योगासने. ( फोटो सौजन्य - Social Media )
ताडासन केल्याने शरीर लांब आणि लवचिक बनते. पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी हे आसन उत्तम आहे, तसेच यामुळे शरीराच्या एकूण लवचिकतेत वाढ होते.
त्रिकोणासन केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो आणि शरीराची लवचिकता वाढते. या आसनामुळे कंबरेच्या आणि पाठीच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे शरीरातील लवचिकता आणि स्नायूंची ताकद वाढते.
वृक्षासन शरीराचे संतुलन राखते आणि पाठीचा कणा मजबूत करते. हे आसन मानसिक स्थिरता आणि एकाग्रता वाढवण्यासाठीही मदत करते.
उत्कटासन हे शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना मजबूत करून पाठीला आधार देते. हे आसन पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी आणि शरीरातील संतुलन वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
भुजंगासनामुळे पाठीचे स्नायू आणि कणा बळकट होतात. हे आसन मणक्यांमधील लवचिकता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे पाठीच्या तणावापासून मुक्तता मिळते.