उन्हाळा वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. यामध्ये डोकेदुखी, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय उष्णशताची समस्या प्रामुख्याने उद्भवू लागते. अशात सर्वच ऋतूंमध्ये उद्भवणारी समस्या म्हणजे मायग्रेन. मायग्रेनची समस्या उद्भवू लागल्यानंतर डोक्याच्या उजव्या किंवा डाव्या भागात असहाय्य वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आहारात या हे हेल्दी पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे मायग्रेनपासून तात्काळ आराम मिळेल.
Migraine च्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पेयांचे सेवन, औषधांपेक्षा प्रभावी पेय
बिघडलेली पचनसंस्था, डोके दुखी इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी धणे आणि दालचिनीच्या पाण्याचे नियमित सेवन करावे. हे पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये काकडी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. याशिवाय काकडी आणि पुदिन्याचा रस नियमित प्यायल्यास शरीर थंड राहील आणि उष्णता कमी होण्यास मदत होईल.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म डोके दुखीच्या समस्येपासून आराम मिळवतो. यासाठी आल्याचा रस काढून त्यात मध मिक्स करून प्यावे . त्यावर गरम पाणी प्यायल्यास लगेच आराम मिळेल.
मायग्रेनच्या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात आवळ्याचा रस प्यावा. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे डोके दुखी तात्काळ थांबते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
मायग्रेनमुळे अधिककाळ डोकं दुखू लागल्यास तुळशीच्या पानांच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि मन शांत राहते.