लग्न सोहळ्यांमध्ये नववधू नवरी साडी नेसण्यास प्राधान्य देते. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच लग्नाच्या खरेदीला सुरुवात केली जाते. नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर पारंपरिक दागिने, सुंदर मेकअप केला जातो. मराठमोळे पारंपरिक दागिने परिधान केल्यानंतर साडीवरील लुक उठावदार दिसतो. पण बऱ्याचदा हेअर स्टाईल कोणती करावी, हे लवकर सुचत नाही. त्यामुळे साडीवरील लुक चारचौघांमध्ये खुलून दिसण्यासाठी या हेअर स्टाईल परफेक्ट आहेत. नक्की करून पहा. (फोटो सौजन्य – pinterest)
नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक

नऊवारी साडी नेसल्यानंतर प्रामुख्याने खोपा हेअर स्टाईल केली जाते. पारंपरिक पद्धतीने खोपा घालून त्यावर फुलांचे गजरे किंवा विविध रंगीत फुले लावली जातात.

चंद्रकोर दागिन्यांप्रमाणे चंद्रकोर वापरून हेअर स्टाईल सुद्धा केली जाते. बन हेअर स्टाईल किंवा खोपा केल्यानंतर तुम्ही चंद्रोकर पिन्स लावून हेअर स्टाईल उठावदार करू शकता.

मेसी बन हेअर स्टाईल मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगला आहे. त्यामुळे मेसी खोपा किंवा फ्रेंच रोल बांधून त्यावर तुम्ही केसांमध्ये भरगच्च दिसतील असे ब्रोच लावू शकता.

काहींना लग्नात युनिक पण पारंपरिक लुक हवा असतो. पारंपरिक लुकला मॉर्डन टच देण्यासाठी तुम्ही या पद्धतीने बन बांधून सुंदर पांढऱ्या मोत्यांचा ब्रोच आंबाडाच्या खालून लावू शकता.

मोगरा आणि चाफ्याच्या फुलांचा गजरा घालायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. त्यामुळे साधा बन करून तुम्ही त्यावर विविध फुलांचे गजरे घालू शकता.






