लग्नातील रिसेप्शन लुकसाठी नवीन नवरी बनारसी किंवा हेवी डिझाईन असलेल्या साडीची निवड केली जाते. बनारसी साडीवर नक्षीकाम, सोन्याच्या जरीचे वर्क साऱ्यांचे आकर्षित करते. लग्नात शालू नेसल्याशिवाय लग्न पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच मुली रिसेप्शन लुकसाठी शालूची म्हणजेच बनारसी साडीची निवड करतात. नववधूचे सौंदर्य आणखीनच खुलवण्यासाठी लग्नात तुम्ही या ट्रेंडींग डिझाईनचे शालू खरेदी करू शकता. या रंगची बनारसी साडी किंवा शालू कोणत्याची त्वचेच्या रंगावर अतिशय सुंदर आणि उठावदार दिसेल. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नासाठी अस्सल बनारसी साड्यांचे रंग आणि स्टायलिंग टिप्स

साखरपुड्यात सर्वच नववधू हिरव्या रंगाची साडी नेसतात. हिरव्या रंगाच्या साडीची निवड करताना प्रथम प्राधान्य डार्क रंगाच्या बनारसी साडीला दिले जाते.

तुम्हाला जर लग्नातील रिसेप्शनमध्ये थोडा युनिक लुक हवा असेल तर तुम्ही जांभळ्या रंगाचा बनारसी शालू नेसू शकता. जांभळा रंग अतिशय सुंदर दिसतो.

गुलाबी रंगाच्या बनारसी शालूवर मोत्याचे किंवा कुंदन वर्क केलेले दागिने अतिशय खुलून दिसतात. गुलाबी रंगाच्या शालूला बाजारात मोठी मागणी आहे.

लाल रंगाच्या बनारसी साडीला नववधू खूप जास्त पसंती दर्शवतात. लाल रंग अतिशय उठावदार आणि सौंदर्य खुलवणारा आहे. लाल रंगाच्या बनारसी शालूवर सोन्याचे किंवा कुंदन दागिने सुंदर दिसतील.

रॉयल ब्लु किंवा निळा रंग कोणत्याही त्वचेच्या रंगावर सुंदर दिसतो. निळ्या रंगाच्या बनारसी साडीवर तुम्ही नीता अंबानींनी केलेला सुंदर लुक पुन्हा नव्याने करू शकता.






