Stock Market Today: असं असणार आज शेअर बाजारातील वातावरण, तज्ज्ञांनी दिला 'हे' स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला
Todays Gold-Silver Price: सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या आजचे दर
मागील सत्रात, सोमवार, २९ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्सने सलग चौथ्या दिवशी घसरण नोंदवली, ३४५.९१ अंकांनी किंवा ०.४१% ने घसरून तो ८४,६९५.५४ वर बंद झाला. एनएसई निफ्टी ५० नेही सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवली, १००.२० अंकांनी किंवा ०.३८% ने घसरून दिवसाचा शेवट २५,९४२.१० वर झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार भारत इलेक्ट्रॉनिक्स, अरविंद फॅशन्स, होनासा कंझ्युमर, आरव्हीएनएल, Cupid, ग्रासिम इंडस्ट्रीज, टाइमेक्स ग्रुप, वारी एनर्जीज, इंडियन ओव्हरसीज बँक, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा आणि शेअर बाजारातील तज्ज्ञ वैशाली पारेख यांनी आज ३० डिसेंबर रोजी गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी काही इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. यामध्ये आयओसी, अशोक लेलँड आणि मॅक्स हेल्थकेअर यांचा समावेश आहे.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक आणि भारतीय शेअर बाजारातील तज्ज्ञ सुमित बगडिया यांनी आज ३० डिसेंबर रोजी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. सुमित बगडिया यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये एनएलसी इंडिया, इंडिया सिमेंट्स, सिटी युनियन बँक, होनासा कंझ्युमर आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी यांचा समावेश आहे. MOFSL च्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स प्रमुख चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. टपारिया यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक, मॅरिको आणि अॅस्ट्रल शेअर्स यांचा समावेश आहे.






