जगण्याचे सौंदर्य साध्या शब्दांत मांडणारे जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ३० डिसेंबर रोजीचा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्रेम, निसर्ग, आनंद आणि वेदना, बालपण, आणि मानवी भावभावनांना कवितेत सोप्या शब्दांत उतरवले अशा या कविचा, नाटककारचा आणि अनुवादकाचा मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्लामध्ये झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत भाषांमध्ये शिक्षण घेतेल. १९५० मध्ये त्यांचे पहिले काव्यसंग्रह धारानृत्यचे प्रकाशन झाले होते. त्यांनी जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी शर्मिष्ठा, उत्सल अशा इतर अनेक काव्यसंग्रह लिहिली आहेत. त्यांच्या या काव्यसंग्रहांना आजही रसिकांकडून भरभरुन प्रेम मिळते. त्यांना २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.तसेच मगेंश पाडगावकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मानही मिळाला आहे.अशा या महान भारतीय कविने ३० डिसेंबर २०१५ रोजी ८६ वर्षी अखेरचा श्वास घेतला.
30 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
30 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष






