रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
पायांमध्ये वारंवार वेदना का होतात?
हार्ट अटॅक येण्याआधी पाय का दुखतात?
रक्तभसिरणात अडथळे कशामुळे निर्माण होतात?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, पाण्याचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवात अतिशय समस्या लक्षणे दिसून येतात. मात्र कालांतराने या लक्षणांमध्ये वाढ होते आणि संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. हार्ट अटॅक, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा रक्तभिसरणात निर्माण झालेले अडथळे शरीरासाठी घातक ठरतात. या आजारांची लक्षणे पायांमध्ये सुद्धा दिसू लागतात. त्यामुळे योग्य वेळी लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी. हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी पायांमध्ये वेदना जाणवू लागतात. डायबिटिक फूट अल्सर, पायांचे असामान्य तापमान, त्वचेच्या रंगात बदल किंवा सूज यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. (फोटो सौजन्य – istock)
वाढत्या थंडीत रोज अंघोळ करावी का? रिसर्चमध्ये करण्यात आला आश्चर्यकारक खुलासा, कारण वाचून व्हाल आनंदी
रक्तभसिरणात निर्माण झालेले अडथळे आणि नसांमध्ये वाढलेल्या वेदना भविष्यात हार्ट अटॅक येण्याचे संकेत दर्शवतात. याशिवाय पायांमध्ये वाढलेल्या तीव्र वेदना हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देतात. आज आम्ही तुम्हाला रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.
झोपल्यानंतर किंवा चालताना वारंवार तुमच्या पायांमध्ये मुंग्या किंवा सुन्नपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. मधुमेह झाल्यानंतर किंवा मधुमेह होण्याच्या आधी हातापायांमध्ये जळजळ आणि सुन्नपणा जाणवतो. याशिवाय मधुमेहावर नियंत्रण न ठेवल्यास पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवांना जखमा होतात.या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत तर आणखीनच वाढून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. पायांच्या नसा कमकुवत झाल्यानंतर वेदना वाढून आरोग्य बिघडते.
हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी पायांमध्ये वेदना जाणवू लागतात. रक्तभिसरणात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे पायांमध्ये वेदना होतात. शरीरातील सर्वच अवयवांना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे पायांमध्ये वेदना जाणवू लागतात. हार्ट फेल्युअर किंवा ‘पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज’ झाल्यानंतर पायांना सूज येते. ही सूज लवकर कमी होत नाही. याशिवाय जास्त चढ उतार केल्यामुळे पायांमध्ये वेदना होण्याची जास्त शक्यता असते.
मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यानंतर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराच्या कोणत्याही अवयवांवर जखमा होऊन आरोग्याला हानी पोहचते. त्वचा अतिशय कोरडी होणे, फाटणे, काळी किंवा निळी पडणे इत्यादी लक्षणाइ दिसू लागतात. पायाला झालेल्या जखमा लवकर बऱ्या न झाल्यास काहीवेळा जखमा चिघळण्याची शक्यता असते. यामुळे पाय किंवा जखम झालेला अवयव काढून टाकावा लागतो. याला ‘डायबिटिक फूट अल्सर’ असे म्हणतात.
पाय थंड पडणे, पायांचा रंग काळा निळा होणे हे रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर दिसून येणारे लक्षण आहे. याला ‘पेरिफेरल आर्टरी डिसीज’ असे म्हणतात. पायांकडे रक्त नेणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर ही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे वारंवार पायांमध्ये वेदना होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
Ans: पायांना किंवा घोट्यांना सूज येणे हे सामान्य आहे, परंतु जर सूज अचानक किंवा सतत असेल, तर ते हृदय किंवा मूत्रपिंडाच्या समस्यांसारख्या गंभीर स्थितीचे लक्षण असू शकते.
Ans: जास्त वेळ उभे राहणे किंवा बसणे, गर्भधारणा, खराब रक्त प्रवाह (शिरासंबंधी अपुरेपणा), किंवा हृदय, यकृत किंवा मूत्रपिंडाचे आजार.
Ans: सौम्य समस्यांसाठी, प्रभावित पायाला आराम देणे, बर्फ लावणे, पट्टी बांधणे आणि पाय उंचावर ठेवणे.






