गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्कक राहिले आहेत. बाप्पाच्या आगमनानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. अनेक घरांमध्ये पूजेचे आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सणावाराच्या दिवसांमध्ये महिला सुंदर साडी किंवा ड्रेस घालून तयार होतात. याशिवाय मेकअप, दागिने आणि केसांची हेअर स्टाईल केली जाते. पण बऱ्याचदा केसांची हेअर स्टाईल केल्यानंतर नेमका कशा पद्धतीने केसांमध्ये गजरा माळवा हे समजत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांमध्ये गजरा मळण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. या नक्की फॉलो करा. (फोटो सौजन्य: Pinterest)
गौरी गणपती सणाला करा पारंपरिक साज! 'या' पद्धतीने केसांमध्ये मळा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा
गौरी गणपतीचा लुक गजऱ्याशिवाय अपूर्ण वाटतो. त्यामुळे जर तुम्ही साडीवर मोकळे केस सोडत असाल तर या पद्धतीने केसांमध्ये गजरा लावावा. यामुळे तुमचे केस अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतील.
शॉर्ट हेअर असलेल्या मुलींना केस मोकळे ठेवायला खूप जास्त आवडतात. अशावेळी केसांमध्ये या पद्धतीने गजरा घातल्यास युनिक हेअर स्टाईल दिसेल.
केस मोकळे सोडल्यानंतर ते लगेच गुंतून जातात. त्यामुळे केसांचा अंबाडा किंवा वेगवेगळी हेअर स्टाईल केली जाते. अशावेळी तुम्ही अंबाड्याभोवती सुंदर मोगऱ्याचा गजरा घालू शकता.
लांब केस असलेल्या महिला प्रामुख्याने केसांची वेणी घालण्यास जास्त प्राधान्य देतात. अशावेळी तुम्ही वेणीला गजरा गुंडाळून सुंदर हेअर स्टाईल करू शकता. यामुळे केसांची शोभा वाढेल.
मोकळ्या केसांमध्ये तुम्ही गजरा आणि ब्रोच दोन्ही सुद्धा लावू शकता. केसांमध्ये कोणत्याही फुलांचा गजरा अतिशय सुंदर दिसेल.