महाराष्ट्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं आहेत. असेच एक मदिर पुणे शहरातही वसले आहे, ज्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर राज्यातील अत्यंत प्राचीन मंदिर आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे, हे मंदिर 8 महिने पाण्याखाली बुडालेले असते, ज्यामुळे भाविकांना फक्त 4 महिन्यांच्या काळात इथे जाता येते. हे मंदिर पुणे जिल्ह्यात वसलेले भगवान शिवाला समर्पित प्राचीन हिंदू मंदिर आहे.
पुण्यातील अनोखे मंदिर जे 8 महिने धरणाखाली बुडालेले असते, फक्त 4 महिने होते महादेवाचे दर्शन; तुम्ही भेट दिलीत का?

हे मंदिर पुण्यात वसले असून याचे नाव वाघेश्वर मंदिर असे आहे. या मंदिराचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे. कोकण-सिंधुदुर्गची मोहिम फत्ते केल्यानंतर महाराज या मंदिरात दर्शनासाठी आले होते

हे मंदिर अवघे 700 ते 800 वर्षे जुने आहे. हे मंदिर संपूर्णपणे दगडांनी बनवण्यात आले आहे. हेमांडपंती शैलीतील हे मंदिर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे

पावसाळा आणि त्यानंतरचे काही महिने मिळून हे मंदिर 8 महिने पाण्याखाली असते. साधारण मार्च महिन्यात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे मंदिर पाण्याबाहेर येते