अनेकांना हे ठाऊक नसेल पण अर्जुनाकडे स्वर्गातली अप्सरा उर्वशीने प्रेमाची कबुली दिली होती. आणि महाभारतातील हा टप्पा अर्जुनाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ठरला. यामध्ये अर्जुनाला श्राप तर मिळाला पण त्याचा फायदाही त्याच्या आयुष्यात फार झाला. नक्की काय होता हा श्राप? जाणून घेऊयात.
फोटो सौजन्य - Social Media
अर्जुन हा इंद्रपुत्र होता. आपल्या पिताच्या घरी वास्तव्यासाठी तो गेला असता, त्याला पाहून उर्वशी मोहित झाली. हे आकर्षण इतके प्रखर होते की तिने अर्जुनाकडे प्रेमाची कबुली दिली.
अर्जुनाने तिला नकार दिला. स्वतः स्वर्गाच्या अप्सरेला नकार मिळतोय, ही बाजू काही पटणारी नव्हती. उर्वशी रागात आली आणि अर्जुनाला चक्क श्रापच देऊन टाकला.
अर्जुन म्हणत होता की तुम्ही आमच्या पूर्वजांची पत्नी आहात म्हणजे मला मातेसमान आहात. पण उर्वशी काही ऐकली नाही तिने त्याला नपुसंक होण्याचा श्राप दिला. तसेच त्याला स्त्रियांच्या सहवासात नर्तक म्हणून राहण्याचा श्राप दिला.
अर्जुनाने हे सगळे घटित इंद्राला जाऊन सांगितले. इंद्राने उर्वशीशी वार्ता केली आणि तिला श्रापाचा कालावधी एका वर्षांसाठी करण्यासाठी सांगितले.
पण यांनतर जेव्हा वनवास संपल्यावर अर्जुन अज्ञातवासासाठी गेला. तिथे अर्जुनाने राजकुमारी उत्तराला नृत्य आणि संगीताचे शिक्षण दिले. त्यामुळे बृहन्नला या रूपाने त्याने आपली ओळख लपवली आणि श्रापचे रूपांतर एका आशीर्वादात केले.