त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ब्युटी क्रीम्स आणि प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र या गोष्टी वापरण्याऐवजी त्वचेची काळजी घेण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर करावा. आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतींना विशेष महत्व आहे. या वनस्पतींच्या वापरामुळे त्वचा आणि केसांसंबधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील पिगमेंटेशन, काळे डाग, पिंपल्स घालवण्यासाठी कोणत्या औषधी वनस्पतींचा वापर करावा, याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
त्वचेसाठी करा 'या' औषधी वनस्पतींचा वापर
केशर किमतीने अतिशय महाग आहे. मात्र केशराचे सेवन केल्यामुळे त्वचा उजळदार होते. त्वचेवरील टॅनिंग, काळे डाग, पिंपल्स निघून जातात आणि त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसते. वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी केशरचा वापर करावा.
कडुलिंबाच्या पानांचा वापर त्वचेवरील पिंपल्स आणि डाग कमी करण्यासाठी केला जातो. चेवरील छिद्रांमधे अडकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा पॅक वापरावा.
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. त्वचेसाठी विटामिन सी अतिशय महत्वाचे आहे. या फळाचा वापर त्वचा आणि केसांसाठी केला जातो. नियमित आवळ्याचा रस प्यायल्यामुळे त्वचेसंबंधित सर्वच समस्या कमी होण्यास मदत होईल.
चंदनाच्या लहानश्या खोडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. बाजारात चंदन पावडर सुद्धा उपलब्ध आहे. गुलाब पाण्यात चंदन पावडर मिक्स करून लावल्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स, पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.
कोरफडचा वापर ब्युटी प्रॉडक्ट बनवण्यासाठी केला जातो. कोरफड त्वचेला लावल्यानंतर चेहऱ्यावर होणारी जळजळ थांबते आणि थंडावा मिळतो. कोरफडचा गर काढून तुम्ही त्वचेवर नियमित लावल्यास त्वचा उजळदार होण्यास मदत होईल.