सर्वच महिला, मुली सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर मेकअप करतात. मेकअप केल्यामुळे महिलांच्या सौदर्यात आणखीन वाढ होते. शिवाय चेहरा आधीपेक्षा अधिक चमकदार आणि सुंदर दिसतो. मात्र दिवसभर त्वचेवर मेकअप ठेवणे त्वचेच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. मेकअप केल्यानंतर तो योग्य वेळी काढला नाहीतर त्वचेची गुणवत्ता खराब होते. मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हरचा वापर केला जातो. पण बाजारात उपलब्ध असलेले केमिकल युक्त मेकअप रिमूव्हर वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर करून मेकअप काढू शकता. चला तर जाणून घेऊया मेकअप काढण्यासाठी कोणते पदार्थ वापरावे.(फोटो सौजन्य – iStock)
मेकअप रिमूव्हर म्हणून वापरा 'हे' घरगुती पदार्थ
मागील अनेक वर्षांपासून कोरफड जेलचा वापर त्वचेसाठी केला जात आहे. कोरफड जेल त्वचेला लावल्यामुळे त्वचेवरील मेकअप काढता येईल. कोरफड जेल त्वचेला लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होणार नाही. त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील.
कच्च्या दुधाचा वापर करून चेहऱ्यावर केलेला मेकअप काढता येतो. यासाठी वाटीमध्ये दूध घेऊन कापसाच्या साहाय्याने तुम्ही मेकअप काढू शकता. दुधात असलेले नैसर्गिक घटक त्वचा हायड्रेट ठेवतात.
त्वचेसाठी खोबरेल तेल अतिशय प्रभावी आहे. खोबरेल तेलाचा वापर करून तुम्ही त्वचेवरील मेकअप काढू शकता. हातांवर खोबरेल तेल घेऊन संपूर्ण त्वचेवर लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून मेकअप काढून घ्या. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या.
गुलाब पाण्याचा वापर करून सुद्धा मेकअप काढता येईल. यासाठी कापसाच्या गोळ्यावर गुलाब पाणी घेऊन संपूर्ण त्वचेवर लावून घ्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यास तुमचा मेकअप सहज निघून येईल.
मेकअप काढण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे बेबी ऑइल. बेबी ऑईलचा वापर करून तुम्ही झटपट चेहऱ्यावरील मेकअप काढू शकता. यामुळे तुमच्या त्वचेचे कोणतेही नुकसान होणार नाही. बेबी ऑइलमध्ये कोणतेही हानिकारक घटक नसतात.