स्टेप १
सर्वप्रथम तुमच्या Android किंवा Apple iPhone वर Telegram App उघडा. नंतर वर दिसलेल्या तीन-लाइन आयकॉनवर टॅप करा.
स्टेप २
तीन-लाइन आयकॉनवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सेटिंग्ज मेनूवर टॅप करावे लागेल.
स्टेप ३
सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर, तुम्हाला येथे Language ऑप्शन दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला Telegram App द्वारे समर्थित भाषांची संपूर्ण यादी मिळेल.
स्टेप ४
लँग्वेज ऑप्शनच्या टॉपला एक भाषांतर बटण दिसेल, ते एनेबल म्हणजेच ऑन करा.
स्टेप ५
हे Telegram Feature अॅक्टिव्ह होताच, तुम्ही कोणत्याही वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये भाषांतर पर्याय वापरण्यास सक्षम असाल. तुम्हाला फक्त भाषांतर पर्यायावर टॅप करायचं आहे आणि तुमचा मेसेज त्या भाषेत बदलला जाईल.