जर तुम्हीही काठमांडूला भेट देणार असाल तर अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला तिथलं सौंदर्य पाहायला मिळेल. तुम्ही तुमचे मित्र, कुटुंब आणि नातेवाईकांसह या ठिकाणी भेट देऊ शकता. या ठिकाणांमध्ये गार्डन ऑफ ड्रीम्स, थामेल, राणी पोखरी तलाव, चंद्रगिरी हिल्स, नगरकोट यांसारख्या अनेक ठिकाणांचा समावेश आहे.
काठमांडूला जाण्यााच विचार करताय? तर या ठिकाणांना नक्की भेट द्या (फोटो सौजन्य - pinterest)
तुम्ही कुटुंबासह किंवा तुमच्या काठमांडूला जात असाल तर तेथील प्रसिध्द ठिकाणांना नक्की भेट द्या.
काठमांडूला येणारे लोक गार्डन ऑफ ड्रीम्सला भेट देऊ शकतात. हे काठमांडूच्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. तेथील सौंदर्य तुमचं मन जिंकेल.
याशिवाय तुम्ही काठमांडूजवळील थामेल या ठिकाणाला भेट देऊ शकता. हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजा करायला जाऊ शकता.
काठमांडूच्या मध्यभागी असलेले राणी पोखरी तलाव हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. जे राजा प्रताप मल्ल यांनी त्यांच्या राणीच्या स्मरणार्थ बांधले होते.
काठमांडूला येणाऱ्या लोकांनी चंद्रगिरी हिल्सचे सुंदर दृश्य जरूर पहावे. येथे एक केबल कार आहे, ज्याद्वारे तुम्ही टेकडीच्या माथ्यावर जाऊ शकता.
या सर्व ठिकाणांव्यतिरिक्त तुम्ही नगरकोटला भेट देऊ शकता. येथून तुम्हाला हिमालय पर्वताचे सुंदर दृश्य दिसते.