एका मर्डर केसपासून ते भुताटकीच्या भयंकर अनुभव देणारी ही कथा जाणून घेण्यासाठी तुम्हाला २०२२ साली प्रदर्शित झालेला 'Dairy' हा चित्रपट पाहावा लागेल. डायरी सिनेमा मूळचा तामिळ भाषेत असून तो हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार अरुलनीतीने मुख्य पात्र साकारले आहे. त्याच्या उत्तम अभिनयाने कथेतील गूढ आणखीन रहस्यमयी स्वरूपात उघड झाले आहे.
Diary: दर ४ वर्षांनी coimbatoreला निघते 'ही' बस; तेच लोकं, तेच दृश्य, पुन्हा-पुन्हा!
Diary ही कथा चीनची प्रसिद्ध कथा 'Bus No. 395' या कथेशी प्रेरित आहे. मुळात, ही तीच कथा आहे परंतु त्याला भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध केले गेले आहे.
सुरुवातीला एक मर्डर केस हाती घेऊन नुकताच तयार झालेला पोलीस ऑफिसर त्या केसचा परदाफाश करण्यासाठी कसे प्रयत्न करतो? आणि अशात तो त्या Horror बसमध्ये कसा पोहचतो?
त्या Horror बसमध्ये दर ४ वर्षांनी घडणाऱ्या दृश्यांना तो कसा सामोरे जातो? या सगळ्या गोष्टींचा अनुभव या चित्रपटात दाखवला आहे.
या चित्रपटामध्ये त्या पोलीस ऑफिसरच्या मृत आई वडिलांचा असणारा त्या Horror बसीशी संबंध काय? हे देखील दाखवण्यात आले आहे.
इतकं सगळं घडून त्या पोलीस ऑफिसरला कळून येते की या बसीचा त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूशी खूप मोठा संबंध आहे. तर तो ४ वर्षांनंतर पुन्हा त्या शोधात त्या Horror बशीत प्रवास करतो आणि पुन्हा तेच व्यक्ती आणि तेच प्रसंग पुन्हा घडताना त्या बशीत पाहतो.