मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे नवे फोटो शूट सध्या बरेच चर्चेत आहे. अप्सराच नवीन लुक सध्या चाहत्यांना घायाळ करत असून सोनालीने या फोटोला दिलेले ‘देखो मगर प्यार से’ हे कॅप्शन देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री सोनाली ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.
तिच्या आगामी चित्रपट, टेलिव्हिजन शो, मालिका इत्यादींसह तिच्या रोजच्या जीवनातील अपडेट्स ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
सोनाली कुलकर्णीने तिचा नवा लुक हा झी मराठी वरील ‘बस बाई बस’ या शो साठी केला आहे.
सोनाली बस बाई बस च्या नव्या एकपिसोड मध्ये दिसणार असून हिरव्या रंगाच्या ड्रेस मधील तिचे फोटोस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत सोनाली फारच सुंदर दिसत आहे.