पूवीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा रोज महिला हातामध्ये बांगड्या घालतात. बांगड्या घातल्यामुळे हात अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. नऊवारी किंवा पैठणी साडीवर नेसल्यानंतर महिला साडीला मॅच होतील अशा वेगवेगळ्या रंगाच्या किंवा हिरव्या बांगड्या घालतात. रंगीत बांगड्यांमध्ये मोत्याच्या बांगड्या मिक्स करून घातल्यास हातांची शोभा वाढेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मोत्याच्या बांगड्यांमध्ये काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाईन्सच्या बांगड्या नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य – pinterest)
नऊवारी किंवा पैठणी साडीवर परिधान करा 'या' डिझाईन्सच्या मोती बांगड्या

लग्नातील हिरव्या चुड्यामध्ये नवरी मोत्याच्या बांगड्या घालते. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने छान चुडा लग्नात परिधान करू शकता.

हल्ली बाजारात कडा पर्ल बांगडी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तुम्ही एक सिंगल बांगडी साडीवर परिधान करू शकता. हा कडा हिरव्या बांगड्यांच्या मागे पुढे घालता येईल.

गजरा बांगड्या किंवा गजरा फुलांच्या माळासारख्या असणाऱ्या मोतीच्या बांगड्या परिधान केल्यानंतर हातांच्या सौदंर्यात वाढ होते. रंगीत बांगड्यांमध्ये हे कडे सुंदर दिसतात.

काहींना जास्त हेवी बांगड्या किंवा कडे परिधान करायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही या पद्धतीचे मोती कडे घालू शकता.

लग्नात नऊवारी साडी नेसल्यानंतर हातामध्ये मोत्याच्या बांगड्या अतिशय सुंदर दिसतील.त्यामध्ये तुम्ही या प्रकारचे मोती कडे परिधान करू शकता.






