सर्वच महिलांच्या कपाटामध्ये जांभळ्या रंगाची साडी असते. जांभळा रंग सगळ्यांवर आधिक सुंदर आणि उठावदार दिसतो. या रंगाची साडी परिधान केल्यानंतर खूप उठावदार आणि आकर्षक दिसतो. जांभळ्या रंगामध्ये अनेक वेगवेगळे शेड्स आहेत. त्यामुळे तुम्ही जांभळ्या रंगाच्या साडीवर वेगवेगळ्या रंगाचे ब्लॉऊज परिधान करू शकता. आज आम्ही तुम्हाला जांभळ्या रंगाच्या साडीवर कोणत्या रंगाचे ब्लॉउज अधिक सुंदर आणि उठावदार दिसतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-pinterest)
जांभळ्या रंगाच्या साडीवर घाला या रंगांचे ब्लॉऊज
गुलाबी रंगाचा ब्लॉऊज सगळ्याच साड्यांवर खूप सुंदर दिसतो. त्यामुळे जांभळ्या रंगाच्या कोणत्याही शेड्सवर गुलाबी रंगाचा ब्लॉऊज घालू शकता.
जांभळ्या रंगाची पैठणी किंवा काठापदराची साडी नेसल्यानंतर तुम्ही डार्क हिरव्या रंगाचा ब्लॉऊज घातला तर अतिशय सुंदर दिसेल.
तुम्हाला जर थोडा पारंपरिक लुक हवा असेल तर तुम्ही जांभळ्या रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगाचा डिझाईन केलेला ब्लॉऊज परिधान करू शकता.
जांभळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही पिवळ्या किंवा फिकट पिवळ्या रंगाचा ब्लॉऊज या पद्धतीने शिवून घेऊ शकता. यामुळे तुमचा लुक अधिक सुंदर आणि उठावदार दिसेल.
सर्वच साड्यांमध्ये ब्लॉऊज पीस असतो. त्यामुळे तुम्ही साडीच्या आतमध्ये असलेल्या ब्लॉऊज पीसपासून या पद्धतीचा सुंदर ब्लॉऊज शिवू शकता.